पान:श्रीएकनाथ.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. विचार करून करतो. आतां तरी तो पूर्ण विचार करून निघून गेला आहे. तूं खातरी ठेव की, त्याचा जर निरुपाय झाला तरच तो माघारा येणार आहे. राम राम ! काय माझी दशा ! वृद्धापकाळानें माझें सर्व अंग शुष्क पर्णाप्रमाणे थर थर कांपते आहे! चालतां चालतां मी अनेक वेळां ठेचाळतों ! अगदी जेव्हां दुसऱ्याच्या तोंडाजवळ तोंड न्यावें, तेव्हां हा अमका मनुष्य आहे, असें ओळखतां येत ! कानांनी हातचे सोडलें ! अशा वृद्धापकाळी नाथा मला तूं टाकून गेलास ! हें तूं फार अनुचित कर्म केलेंस ! (मूच्छित पडतो.) सरस्वती-हा एक दुसराच अनर्थ ओढवू पहात आहे. असे वरचेवर निचेष्ट पडल्याने पटकन् प्राण निघून जावयाचा. आपण पुरुषासारखे पुरुष, आपण जर असें धैर्य सोडले, तर आह्मी बायकांनी काय बरे करावें ! मुलाचा पक्का शोध करा. जो कोणी त्याचा तपास लावून देईल, त्याला आपण आपल्या घरची अर्धी मिळकत देऊ. मुलगा जिवंत आहे अशी आशा करण्याला आपल्याला जोपर्यंत जागा आहे, तोपर्यंत तुम्ही असे हातपाय गाळू नका. या तुमच्या स्थितीकडे पाहिले म्हणजे माझी कंबर खचते. चक्रपाणि-(शुद्धीवर येऊन ) माझ्या डोळ्यांस अंधाऱ्या येऊ लागल्या. तोंड कोरडे पडले. माझ्याने आतां जास्त बोलवत नाही. तुला इतकेंच सांगतों की, भानुदासाचे वंशाचा कुलदीपक आज मावळला! पांडुरंगाची मर्जी ! आतां ह्मणजे एकनाथ परत येतो, असें थोडेच आहे ! कर्मात असेल तें चुकत नाही. मी देवाला दोष देत नाही. दैवाला दोष देतो. आपण या जन्मी नाही, परंतु पूर्वजन्मी घोर पातकं केली आहेत, त्यांची कडू फळे आपल्याला भोगिली पाहिजेत. एक्याच्या पोटी एखादें पुत्रसंतानसुद्धा नाहीं की, मी त्याच्याकडे पाहून समाधान करून घ्यावें. मला जीव नकोसा झाला आहे. परमेश्वरा, आतां किती माझा अंत पाहतोस ? विठ्ठल विठ्ठल ? (मूच्छित पडतो.) सरस्वती-यांच्यापेक्षा मला अगोदर मरण येईल तर किती उत्तम होईल ! अहेवपणी मला मरण आले तर सोने होईल. पण तें मेलें कोठे गुंतलें आहे कोण जाणे ! एवढाले दुःखाचे डोंगर अंगावर