पान:श्रीएकनाथ.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. पालथे घातले. नदीत, गांवांतल्या विहिरीतून पानबुडे घातले. दूरदूरच्या जुनाट पडक्या देवळांतून त्याला बसायचा नाद आहे. तेथे तेथे जाऊन शोध केला. फार तर काय पण गांवोगांव जासद. सुद्धां नाथाच्या शोधाला पाठविले आहेत. सरस्वती-पण तुझी त्या व्यंकटाचार्य पुराणिकाकडे गेला होता का ? त्याच्याबरोबर नेहमी तो एकांत करीत बसत असे. का दोघेजण मिळून देशावर निघून गेले ? . चक्रपाणि-एवढे मात्र खरें. तो पुराणीक आजच कसा गांवाला गेला ? याचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. मला वाटते, पोराला त्यानेच फसविलें. कोठे तरी पोराला घेऊन गेला. पण असे म्हणावें तर पुराणीक मोठा सज्जन माणूस आहे, त्याच्या हातून असें दुष्ट कृत्य होणार नाही, अशी माझ्या मनाला खातरी वाटते. काल संध्याकाळी मला पुराणीक भेटला होता. गांवाला जा ण्याचे संबंधाने त्याने अवाक्षरसुद्धां काढिले नाही. पुत्रशोकामुळे अगोदर हे हृदय कसे करपून गेलें आहे. त्याच्यावर या नाथाच्या वियोगाने होणारे दुःख माझ्याने आतां सहन करवत नाही. परमेश्वरा, सोडीव मला या दुःखांतून ! अगे, पुरुष बायकांप्रमाणे हंबरडा फोडून आक्रोश करून दाखवीत नाहीत, परंतु अंतर्यामी त्यांच्या पोटांत जी कालवाकालव चाललेली असते, तिचे वर्णन करता येत नाही. वृद्धापकाळचा माझा आधारस्तंभ कडाडून पडला ! माझा नाथ नाहीसा झाला ! ! हाय हाय !! मी आतां काय करूं? सरस्वती-म्हटलें, तुझी जर असे हातपाय गाळले, तर मी अबलेने काय करावे ? माझा नाथ जिवंत आहे; त्याला काही मृत्यूनें आपल्या जबड्यांत ओढून नेला नाही. तो पुराणीक आणखी हा कोठे तरी काल रात्री उठून गेले. नाही तर रामेश्वराला गेले अस तील. पृथ्वीच्या पाठीवर कोठेहि का होईना, खुशाल असला झणजे झाले. केव्हां ना केव्हां तरी आपल्याला तो भेटल्याविना राहणार नाही. त्याला तरी आपला वियोग सहन होणार कसा? चक्रपाणि-मला तर त्याच्या भेटीची काही आशा दिसत नाही. कारण तो फारच विचारी मुलगा आहे. कोणतेंहि काम तो ध्या