पान:श्रीएकनाथ.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ला. प्रवेश २ रा. स्थळ-पैठण येथील चक्रपाणि याचे घर. ( चक्रपाणि व त्याची बायको सरस्वती एकनाथ सांपडत नाही म्हणून सचिंत बसलेली आहेत.) सरस्वती-अहो ऐकलेंका, रोजच्याप्रमाणे मी एक्याला जागे करायला गेलें. दहा बारा हाका मारल्या, पण ओ कांहीं देईना, म्हणून खोलीचें दार उघडून आंत जाऊन पाहते, तो एकनाथ मुळीच तेथें नाही. बाहेरच्या दरवाज्याची कडी मोकळी होती. मला वाटतें तो मध्यानरात्रींच निघून गेला. आतां देवा आम्ही काय करावें ! चक्रपाणि-साऱ्या आळीत तपास करून आलो. ज्यांच्या ज्यांच्या घरी त्याची जाण्याची वहिवाट आहे, तेथे तेथे जाऊन माझा नाथ कोणी पाहिला का, ह्मणून विचारून आलों, परंतु त्याला कोणी पाहिल्याचे देखील सांगत नाहींत.. सरस्वती-माझ्या नाथाच्या गुणाला मोल नाही. त्याची विलक्षण बुद्धि, त्याची शांतवृत्ति, सगळ्या पैठणच्या आबालवृद्धाला, कोणाला म्हणजे नाथ नको, असें कांही नाही. किती तरी आमच्या आज्ञेत ! घोटभर पाणी पिऊन रहा झटले तरी रहावयाचा. त्याचे लहानपणचे खेळ झटले म्हणजे लहानलहान गोटे मांडून त्यांची पूजा करायची, खांद्यावर पळी घेऊन तिचा विणा करायचा, काठीला फडकें बांधून तिची पताक करून पंढरीच्या वारीस जाण्याकरितां निघायचा, नेहमी रामरुण्ण हरिगोविंद ही नामावळी 'मुखाने चाललेली ! माझा एवढा मुलगा सूर्यनारायण गेला, पण या नातवाकडे पाहून आमी दिवस काढीत होतो तें कांहीं देवाला सहन झाले नाही. आतां या मुलाचा शोध कोठे तरी करावा ? चक्रपाणि-श्री पांडुरंग जेव्हां भानुदासास प्रसन्न झाले, त्यावेळी net त्यांनी हाच वर मागितला होता की, 'तुझी माझ्या वंशांत अवतार घ्यावा. त्यावरून मला असे वाटत असे की, माझा एकनाथ पांडुरंगाचा अवतारच आहे. सगळी पैठणकर मंडळी त्याचा शोध करीत आहेत. गंगेच्या काठी त्याचा शोध केला. सारें वाळवंट