पान:श्रीएकनाथ.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. गावबा-(इकडे तिकडे पहात, कोणी ऐकत नाही, अशी खातरी झाल्यावर ) हे पहा, आपल्या घरांत तांबडे मुंगळे झाले किनई, म्हणजे उकरड्यास दहीभाताचा नैवेद्य दाखवावा म्हणजे नाहीसे होतात. . एकनाथ-हा मूर्खा ! हाच का मोठा शोध ? व्यासाला आणखी वाल्मीकाला ज्याचा पत्ता नाहीं तो? गाववा-तुम्ही अनुभव घेऊन पहा. मग बोला. लाखों कोट्यावधि तांबडे मुंगळे जर आपल्या घरांत झाले, तर तुम्ही काय कराल ? घर सोडून द्याल काय ? हजारों रुपये खर्च करून बांधलेलें घर तुमच्याने सोडवेल काय ? एवढ्याकरितां हा उपाय मी व माझ्या चतुरमातोश्रीने शोधून काढला आहे. तुम्ही असें पहा की, तेहतीस कोटी देवता श्रीविष्णूचे पोटांत आहेत, मग म्हसोबाला शेण कां थापावें लागते ? तशीच ही युक्ति आहे, समजलास ? (जोराने पळत जातो.) पुराणीक-नाथा, तूं त्या वेड्याच्या नादी काय लागतोस ? एकनाथ-बरें तें असो. आपलें नेहमी सांगणे आहे की, योग्य गुरुमुखाशिवाय बम्हज्ञान प्राप्त होणार नाही. माझा विचार आतां देवगडचे किल्ल्यावर जाऊन श्रीजनार्दनमहाराजांस शरण जाण्याचा आहे. आजोबाला आजीला विचारून जावें, तर प्राण गेला तरी ते जाण्याला परवानगी देणार नाहीत. तुमचा विचार या कामांत कसा काय पडतो ? पुराणीक-माझा विचार पुसशील तर असेंच परभारें चालतें व्हावे. आजाआजीची परवानगी घेण्याच्या भरीस पडलास की फस. लासच म्हणून समज. उलट तूं इकडे तिकडे पळून जाशील म्हणून तुला जास्त अटकेत मात्र ठेवतील. मीहि आतां त्याच बाजूला एका गांवी जात आहे. पाहिजे असल्यास आपण सोबतीने जाऊं. एकनाथ-मग तर फारच चांगलें झालें. जय जनार्दन स्वामीकी जय. (उभयतां हातात हात घालून जातात.)