पान:श्रीएकनाथ.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. एकनाथ-तर मग, गावबा, तूं तर व्यासवाल्मीकापेक्षा मुद्धा बुद्धिवान् झालास म्हणावयाचा ? गाववा-यांत काय संशय. हा पठ्या तसाच हुशार आहे. पुराणीक-पण जे आहे त्तें गावबाला नवीन शोध कशाचा लागला आहे, हे आम्हांला एकवार कळू तर द्या. गाववा-(तोंड वांकडे करून ) जे आहे तें, जे आहे - जे ते कालाचे ठायीं-तेथें होती लक्ष्मीबाई—(हंसतो.) पुराणीक-(गावबास चापट्या मारतो, तरी तो हंसतोच.) चिप्प, चिप्प. जास्त बोललास तर खबरदार. एकनाथ-अहो, तो बोलून चालून वेडा. त्याचे बोलणे आपण इतकें मनावर कशाला घेतां ? | पुरा-तुम्हीच त्याला जे आहे ते अगदी डोक्यावर चढविला आहे. जेव्हां तेव्हां माझें सोंग आणीत असतो.हे मला बिलकुल खपावयाचें नाहीं. गावबा-धोंड्याच्या महिन्यांत जे आहे तें बायकांनी अनरशांची त्याचप्रमाणे जे आहे ते घिवरांची, मोतीचूर, जिलबी, दळ, बेसन, बुंदी, ह्यांच्या मोठमोठाल्या लाडूंची वायने जे आहे त्तें पुराणीकबुवास द्यावीत. (पुराणीक गावबास मारतो. एकनाथ त्याला सोडवितो.) एकनाथ-तें जाऊं दे गावबा. पण तूं आमचा लहानपणचा दोस्त ना ? तेव्हां नवीन शोध, जेथें व्यासादिकांची मति कुंठित झाली, असा तुला लागला आहे; तो आम्हांला सांग. आम्ही कोणाला सांगणार नाही. गावबा-पुराणीक बुवा, तुम्ही आमची गुप्त गोष्ट ऐकू नका. तिच्यावर तम्ही कोट्यावधि रुपये मिळवाल. पन्नास हजार रुपये या घटकेस मोजीत असाल, तर तुम्हाला ती गम्मत सांगतो. पुराणीक-फुटकी कवडीसुद्धां देणार नाही. मी आपला लांब जाऊन उभा राहतो. मग तर झालेंना ? गावबा-(एकनाथाच्या कानांत मोठ्याने ओरडून ) अतिशय महत्वाचा, संसारांत अत्यंत उपयोगी असा शोध लागला आहे. एकनाथ-कळ तर दे एकदां; रडूं दे काय आहे तें.