पान:श्रीएकनाथ.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. आहे, हे जाणून संसारांत असून कितीएक महासाधु पारमार्थिक कसे बनले! ध्रुवाला अढळपद कसें प्राप्त झालें ! उपमन्यूला क्षीरसागर कसा मिळाला ! ह्या महत्वाच्या गोष्टी माझ्या मनांत घोळू लागल्या ह्मणजे माझ्या अंगांत आवेश उत्पन्न होतो. माझे बाहु स्फुरण पावतात काही तरी महत्कार्य माझ्या हातून झाले पाहिजे, अशी माझी मनोवृत्ति होऊन जाते. (श्रीशंकरास साष्टांग नमस्कार घालतो, इतक्यांत आकाश" वाणी होते. “देवगड किल्ल्यावर जनार्दनपंत देशपांडे, महा सत्पुरुष, यवन बादशहाचे पदरी आहेत, त्यांना शरण जा. त्यांना गुरु कर, ह्मणजे इष्टहेतु सिद्धीस जातील.") हा प्रचंड ध्वनि खरोखर श्रीशंकराचे पिंडीतून उत्पन्न झाला. काय चमत्कार आहे ! पुराणांत आकाशवाणी झालेली आपण ऐकतों, परंतु आज मला प्रत्यक्ष अनुभव आला. ( बेलांचे झाडांवर ठिकठिकाणी बेलाच्या कांट्याने आकाशवाणींतील अक्षरें पुनः पुनः लिहितो व पुनः पुनः त्यांचा उच्चार करितो.) आतां घरी परत जा वयाचें नाही. आजोबाची वृद्धावस्था, माझ्या वियोगाने त्यांना wlk आणखी आजीला होणारे दुःख, त्यांची मजवर असलेली पराकाष्ठेची ममता, वगैरे गोष्टी मनांत आल्या ह्मणजे माझा कंठ भरून येतो, अदा नेत्रांवाटे अश्रु वाहू लागतात; पण ते काही नाही. देहाचे सार्थक झाले पाहिजे. अंतकाळी कोण सोडविणार आहे ! मातापिता, सोयरेधायरे, हे कोणी निर्वाणीचे नाहीत, एक सद्गुरु आहे. बायको म्हणते, मी सर्वस्वी तुमची, पण केशवपनाचा प्रसंग आला झणजे केशांसाठी तीहि रई लागते. या वेळी मन कठोर केले पाहिजे. आता दोनप्रहर रात्र उलटून गेली आहे. उजाडण्याचे सुमारास सात आठ कोस सहज निघून जाऊं. याच पावली देवगिरीचा रस्ता धरला पाहिजे. (जाऊ लागतो, इतक्यांत व्यंकटाचार्य पुराणीक व गावबा वेडा प्रवेश करतात.) गावबा-(एकनाथास भय दाखवितो. एकनाथ दचकतो. हे पाहून आपण पोट धरधरून हंसतो. ) नाथा, आज मला अशी एक नवीन - जम्मत सांपडली आहे ! ती मी अगदी अगदी कोणाला कोणाला सांगणार नाही. फारच मोठ्या गोष्टीचा शोध लागला आहे. अगदी व्यासवाल्मीकालासुद्धा त्याचा पत्ता लागला नव्हता.