पान:श्रीएकनाथ.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. अंक पहिला. प्रवेश १ ला. स्थळ-गोदावरीच्या तीरावरील श्रीशंकराचे जीर्ण देवालय, ( एकनाथ शंकराची पूजा करून कर जोडून स्तुति करतो. ) एकनाथ-ॐ शिवाय नमः, हे हेरंबतात, हे पुराणपुरुषा, हे अनादिसिद्धा, हे मायाचक्रचालका, हे पंचवदना, हे त्रिपुरांतका, हे दक्षमखविध्वंसका, तुला मी अनन्यभावें शरण आहे. (एकीकडे ) परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन कोणत्या रीतीने होईल, ही चिंता माझ्या मनाला रात्रंदिवस लागून राहिली आहे. आईबाप लहानपणी वारले. आजोबा नेहमी म्हणतात, 'एक्या, भानुदासाच्या वंशांतील तूं एकच तंतु उरला आहेस, तस्मात् त्यांच्या वंशाला शोभेल, अशी रुति तुझ्या हातून घडून आली पाहिजे. ' भानुदासाचा अधिकार केवढा ! आनागोंदीच्या राजाने नेलेली श्रीपांडुरंगाची मूर्ति ज्याने पंढरपुरास परत आणिली, ज्याने बाळपणांत सूर्यनारायणाची सेवा करून वंश सुशोभित केला, तो भानुदास कोणीकडे ! अशा वंशांत मी उत्पन्न होऊन केवळ भूमीला भारभूत झालो आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार यांचा अनिवार मारा माझ्याने सहन होत नाही. आशामनीषा, माया यांनी माझ्या जिवाला भूल पाडली आहे. (श्री शंकरास उद्देशून ) कायावाचामनेकरून मी तुला अनन्यभावें शरण आहे. माझी सर्व लाज तुला आहे. पुराणांतील कथा श्रवण करून माझी चित्तवृत्ति बावरून जाते. परमेश्वराने निरनिराळे अवतार धारण करून आपल्या भक्तांचे हेतु कसे परिपूर्ण केले ! हा संसार केवळ निःसार