पान:श्रीएकनाथ.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही काम श्रीतुकाराम कि० १२ आणे ट. १ आणा. अभिप्राय पारमार्थिक विषयावर हे नवीन नाटक झालेले असून ते जनरुचीच्या ओघास नवीन वळण लावून देण्यास अंशतः तरी उपयोगी पडेल अशी आमांस आशा आहे. केसरी. यांत श्रीतुकाराम यांच्या चरित्राचे वर्णन फार चांगले साधलें आहे. केवळ शृंगारिक गोष्टीशिवाय इतर रसांच्या आश्रयाने लोकरंजन करण्याचा यांत प्रयत्न आहे. त्याबद्दल ग्रंथकर्त्याची तारीफच केली पाहिजे. सुधारक. रा. शिरवळकर यांनी नाट्यालंकार चढवून विशेष शोभा आणिली आहे. प्रवेशाची जुळणी संगतवार झाल्याने प्रयोगाचे वेळी या नाटकास सारखा रंग भरत जातो व त्याचा परिणाम प्रेक्षकांचे मनावर चांगला होतो या गुणाबद्दल रा. शिरवळकर हे स्तुतीस पात्र आहेत. का नेटीव ओपीनियन. रा. शिरवळकर यांचा हा प्रयत्न नवीन धर्तीचा असून तो नाटक या दृष्टीने चांगलाच पार पडला आहे. रा. शिरवळकर यांनी आपला प्रयत्न पुढे चालवावा अशी त्यांस आमची आग्रहाने सूचना आहे. म श्रीसयाजीविजय. " श्रीतुकाराम” नांवाचे नाटक वाचून वाचकांच्या मनावर फारच चांगला परिणाम होईल. निरनिराळ्या प्रसंगी प्रकट झालेले उदात्त विचार वाचून कोणाचे मन सद्गदित होणार नाही ! काळ. रंगभूमीवर हा प्रयोग उत्तम होत असतो. त्याच्या दर्शनाने भक्तिभाव जागृत होतो म्हणून ह्या नाटकाच्या संबंधाने आमच्या महाराष्ट्राच्या वतीनें ग्रंथकाराचे फार फार अभिनंदन करितों. इंदूप्रकाश.