पान:श्रीएकनाथ.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ श्रीएकनाथ. तेथें ॥ वेगळेंची असो पां ॥ ७ ॥ विश्वरूपी सृष्टी ॥ अर्जुनातें दावी दिठी ।। भिन्न भेदाची गोष्टी ।। बोलों नये सर्वथा ॥८॥ वत्सा हरणीचे चरित्र ॥ वत्स गोवळे स्वतंत्र॥ पांवे पायतन कटिसूत्र ॥ आपणची जाहला ॥ ९॥ एका जनार्दनीं ॥ विश्वरूप गोविंद मानी । भेद धरी तो मनीं ॥ निंद्याहुनी अति निंद्य ।। १० ॥ सर्वत्रांस माझा प्रणिपात आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की, या तुमच्या एकनाथाला विसरूं नका. आरती. ॥ अवलोकितां जन दिसे जनार्दन ॥ भिन्न भिन्न तेथे दावी अभिन्न ।। अनेक एकत्वें दिसे परिपूर्ण ॥ ठकली मन बुद्धि ॥ तेथे कैंचे गुणागुण ॥१॥ जयदेव जयदेव जय जना. दना ॥ परमार्थ आरती अभिनव भावना ॥धृ०॥ ज्योतीची ही ज्योती उजळोनीयां दीप्ती।।तेणें तेजें केली सतेज आरती ॥ पाहतां पाहते पण पाहवया स्थिती ॥ नुरोचे वेगळेपण देह भान स्फूर्ती ।। २॥ उजळीते उजळण उजळाया लागी ।। वेगळेपण कैंचं नुरेचि ते भोगी ।। अंगे अपीलें अंगीचे अंगीं । जीवशीवपण गेले हरपोनि वेगीं ॥३॥ पाठीना पोटीं अवघा निघोट । सर्वांचा देखणा सर्वांवरिष्ट ॥ इष्ट न अनिष्ट गुप्तना प्रगट ॥ अहं सोहं सगट भरिला घोट ॥४॥ सर्वथा दिसे परी नाकळे मना । जे जे दिसे ते ते दर्शना जाणा । अभाव भावेंसी गिळिली भावना ॥ अभिनव आरती एका जनार्दना ॥ ५॥ (जनार्दन नामाचा उच्चार करून विट्ठलनामाच्या जयघोषांत उभयतां गंगेंत समरस होतात. दिव्य प्रकाश पडतो. सुरगण विमानांतून नीलोत्पलपुष्पांची वृष्टि करतात. ) समाप्त.