पान:श्रीएकनाथ.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पानपतचा मुकाबला किं. ८ आणे ट. १ आणा. अभिप्राय. गतिहासिक नाटक या दृष्टीने पाहिले असतां या नाटकाची मराठीतील चांगल्या नाटकांत गणना करितां येईल. भाषा जोरठार व नाटकाच्या कालास शोभण्यासारखी आहे. अशा रीतीच्या ऐतिहासिक नाटकाचे प्रयोग होतील तर पूर्वजांचा अभिमान जागृत होऊन अनायासे करमणूकही होईल. केसरी. ऐतिहासिक नाटके आमच्या मराठी भाषेत अजून फारशी झालेली नाहीत. त्यांतही इतिहासाला फारसे न सोडितां रचलेली नाटके फारच थोडी. अशा दृष्टीने पाहतां प्रस्तुत नाटक हा एक योग्य दिशेने झालेला चांगला प्रयत्न आहे. सुधारक. वीररसयुक्त अशी भाषा लिहिण्याची हतोटी तुझांस चांगली साधली आहे. प्रयत्न वाग्वाणण्यासारखा आहे न्यायमूर्ति रानडे. व्याकाळी हिंदु स्त्रियांत जी थोरवी व स्वाभिमान व स्वधर्मपरायणता होती, तिची ओळग्व सध्याच्या काळच्या मुलांस ह्या पुस्तकापासून फारच चांगली होणार आहे. मी ह्यांतले कांहीं काही भाग पुनः पुनः वाचले तरी प्रत्येक वेळेस डोळे भरून येत. प्रो. जिन्सीवाले. सोनपतपानपतच्या शोकपर्यवसायी बोर प्रसंगाचे हे एक हुबेहुव चित्र असून, तें रंगभूमीवर आणून हल्लीच्या लोकांच्या मनावर आपल्या पूर्वजांचें शौर्य, धैर्य, मर्दुमकी व त्यांजवर आलेले अनेक घोर प्रसंग, यांचा ठसा उठविण्याचे कामी ते फार उपयोगी पडेल अशी माझी खातरी आहे. डाक्तर गर्दै पत्ता-यासुदेव रंगनाथ शिरवळकर कसबा पेठ नं.२१° पुणे