पान:श्रीएकनाथ.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १६१ 'पांडुरंगाची पूजा करण्याकडे आणि सत्पात्री धर्म करण्याकडे करा. नाही तर जडित मुद्रांच्या योगाने हाताला शोभा येणार नाही. प्रेताला अलंकार , घातल्याप्रमाणे होणार आहे. नामस्मरणाच्या योगाने वाचेचे सार्थक करा. त्याच्याशिवाय मिथ्यावाद कगल तर हागवण लागल्याप्रमाणे व्यर्थ बडबड आहे. तात्पर्य नानाप्रकारें गद्यपद्य स्तवनांच्या योगाने पांडुरंगाची स्तुति करावी. भागवत धर्म ह्मणजे परमेश्वराची भक्ति. भक्तीशिवाय कर्मधर्म भ्रम आहे. भक्तीशिवाय सत्यवादीपणा गर्भाधाप्रमाणे आहे भक्तीशिवाय दयेची थोरवी मिरविणे ह्मणजे सौंदर्ययुक्त स्वीस नवरा नसल्याप्रमाणे आहे. भक्तीशिवाय विद्वत्तेचा टेंभा मिरविणे ह्मणजे चंदनाचा भार पाठीवर घेतलेल्या गर्दभाच्या गायनाप्रमाणे आहे. भक्तीशिवाय शरीर पोषण कमान तप ते केवळ पूर्व अदृष्टाप्रमाणे पाप भोगणे होय. भक्तीशिवाय जी अन्य साधने ती कोशकीटकाने केलेल्या बंधनाप्रमाणे होत. माश भक्तीशिवाय सर्व गोष्टी अप्रमाण होत. तुमच्या हिताकरितां भारी मत्यलोकीं अवतार घेतला. येरवी मी मायातीत चैतन्यघन परिपूर्ण असा आहे. धर्माधिकारी--आतां स्वामींना पुनः केव्हां अवतार घ्यावा लागेल, हे जाणण्याची सर्वांची इच्छा आहे. एकनाथ- अभंग. * धर्माची वाट मोडे ।। अधर्माची सीग चढे॥ ते आह्मां येणे घडे ॥ संसारस्थिती ॥ १ ॥ नानामते आणि पाखंडे ॥ कर्मठता अतिबंडे ।। त्यांची ठेसावीं तोडें । हरिभजनकरूनियां ॥२॥ जे जे हरिलीलाचरित्र ।। ते ते माझेंचि स्वतंत्र ।। देव भक्त एकत्र ॥ भेद नाहीं दोघांतें ॥ ३॥ जो जो अवतार हरी धरी ॥ तो तो मीच अवधारी॥ हरिनामें करितो गजरी।। जगदुद्धाराकारणें ॥४॥ सर्वांभूती भगवद्भावो ॥ हा भक्तीचा निजनिर्वाहो ॥ धर्माचा अनुग्रहो ॥ वाढवावयालागीं ॥५॥ सर्वांभूती दया शांती॥ प्रतिपाळावी वेदोक्ती ।। हेचि एक निश्चिती ॥ कारणे आह्मां लागते ॥६॥ लीलाविग्रही भगवंत । तया ह्मणती नित्य मुक्त ॥ आझी काय य