पान:श्रीएकनाथ.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. नामें ब्रह्म हातां चढे ॥२॥ हरि ह्मणा उठतां हरि ह्मणा बैसतां ॥ हरि ह्मणा पाहतां लोकलीला ॥३॥ हरि ह्मणा आसनी हरि ह्मणा शयनी ॥ हरि ह्मणा भोजनी ग्रासोग्रासी ॥४॥ हरि ह्मणा जागतां हरि ह्मणा निजतां ॥ हरि ह्मणा झुंजतां रणांगणीं ॥ ५॥ हरि ह्मणा येकटी हरि ह्मणा संकटीं ॥ हरि धरा पोटीं भावबळें ॥६॥ हरि ह्मणा हिंडतां हरि ह्मणा भांडतां ॥ हरि ह्मणा कांडितां साळीदाळी ॥ ७ ॥ हरि ह्मणा देतां हरि ह्मणा मागतां ॥ हरि ह्मणा गातां पदोपदी॥८॥हरि ह्मणा देशी हरि ह्मणा परदेशी ॥ हरि ह्मणा अहर्निशीं सावधान ॥९॥हरि ह्मणा जनीं हरि ह्मणा विजनीं ॥ एका जनार्दनीं हरी नांदे ॥१०॥ बाबानों, कलियुगांत नामाशिवाय तरणोपाय नाही. सर्वाभूती दया ठेवा. नवविधा भक्ति करा. चौचायशीचा फेरा चुकेल. माझ्या वचनावर विश्वास ठेवा. नाही तर फसाल. दारांत तुळशीवृंदावन असावें. अतिथीचे पूजन करावें. संताला शरण जावें. कंठांत तुळशीची माळ मिरवावी. एकादशी व्रत करण्यास चुकू नका. रात्री हरिकीर्तन करा. द्वादशीस क्षिरापत करा. वैष्णवाच्या भक्तीची ही लक्षणे आहेत गीता-ज्ञानेश्वरी-भागवत ह्यांचे नेहमी पठण मनन करावें. शुभाशुभ प्रसंग प्रारब्धाचे आघात आहेत असे समजावे. सर्व कम रुण्णार्पण करावी. संसाराविषयी काळजी बाळगू नका. तो क्षणभंगुर आहे. पुत्रशोकाने किंवा पत्निवियोगाने दुःख करूं नका. रस्त्यांत किवा नावेमध्ये जसे बारा घरचे बाराजण मिळतात, परंतु एकमेकाबद्दल सुखदुःख मनांत न आणतां परस्पराविषयी उदासीन असतात, त्याचप्रमाणे या भासमान संसाराविषयी बारशाच्या वेळी व बाराव्याच्या वेळी चित्तवृत्ति सारखीच ठेवा. दृष्टीचा उपयोर देवाच्या दर्शनाकडे अथवा संतांच्या दर्शनाकडे करा. संताच्या आलिंगनानें शरीर पवित्र करा. चरणांचा उपयोग संतसमागमें चालण्याकडे अथवा तीर्थयात्रा करण्याकडे अथवा हरिकीर्तनाला जाण्याकडे करा. नीच लोकांपुढे लांगुलचालन करून जें नृत्य करतां त्यापेक्षा हरिरंगी नाचाल तर चरणाचें सार्थक होईल. हातांचा उपयोग