पान:श्रीएकनाथ.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १५९ निर्माल्याबरोवर नदीत गेला. तेव्हां त्या ब्राह्मणास नदीवर नेऊन असंख्य परीस दाखविले! काशींत बाह्मणानें फेंकून दिलेला भागवत ग्रंथ गंगे, हात वर करून झेलला ! देवानें कावडीने बारा वर्षे पाणी भरले ! दुसरा निंदक- ही सर्व चमत्कारांची मालिका झाली. पण मी ह्मणतों, मरणाचा रस्ता सगळ्यांचा सारखाच की नाही? इतर लोकांप्रमाणे हे आतां आमच्याच खांद्यावर जाणार की नाही ! जाणार ते जाणार आणखी सहकुटुंब जाणार ! . धर्माधिकारी--(हात जोडून, ) महाराज, जगाचा उद्वार करण्याकरितां आपण सगुण अवतार धारण केला. इतर लोकांप्रमाणे आपल्याला मरण न यावे अशी आमची इच्छा आहे. एवढी पूर्ण करावी. रुष्णदास लोले आपल्याला शरण आला. त्याचे आयुष्य अकरा दिवस आपण वाढवून त्याने रचलेल्या रामायणाच्या युद्धकांडाची समाप्ति केलीत. तशाच रीतीने याही वेळी काळाला थांबवन भावार्थरामायण हा ग्रंथ सिद्धीस न्यावा, म्हणजे आम्हां सर्वांना संतोष होईल. एकनाथ व गिरजाबाई उठून बसतात, सर्वत्र नामाचा जयघोष करितात.) एकनाथ-आपलें कवित्व आपण सिद्धीला नेण्याबद्दल काळाला थांबविणे हे अगदी अश्लाघ्य आहे. आमच्यामागे गावबा ग्रंथाची समाप्ति करील. गावबाला लेखणी अर्पण केलेली आहे. आतां तुम्ही म्हणतां आम्हांस खांद्यावर सहकुटुंब न्यावे लागेल त्यास आम्ही आपल्या पायांनीच गंगेत प्रवेश करतो. गंगेच्या पवित्र उदकांत उभयतां समरस होऊन जातो. चला उठा. (लोक एकनाथास तुळशीचे व फुलांचे हार घालतात, सर्वांस बुका लाावेतात, गिरजाबाईस सुवासिनी हळदकुंकू देतात, खणांनारळांनी ओटी भरतात, विटल नामाचा गजर होतो. पडदा वर जातो. नदीचा देखावा दिसतो. नामस्मरणाचे गजरांत एकनाथ व गिरजाबाई नदीत कमरे इतस्या पाण्यात प्रवेश करितात.) अभंग. हरि ह्मणा बोलतां हरि ह्मणा चालतां ॥ हरि ह्मणा खेळतां बाळपणीं ॥१॥ ह्मणा हरिनाम पुरती सकळ काम ॥ हरि