पान:श्रीएकनाथ.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अक ५ वा.. १५७ अभंग. कानी घालुनीयां बोट नादजे पाहावे॥न दिसतां जाणावें नऊ दिवस ॥१॥ भोवया पाहातां न दिसे जाणा ॥ आयुव्याची गणना सात दिवस ॥ध्रु० ॥ डोळां घालोनीयां बोट चक्रजें पाहावें ॥ न दिसतां जाणावें पांच दिवस नासायाचें अग्र न दिसे नयनीं । तरी तेंची दिनी ह्मणा रामकष्ण ॥३॥ ज्ञानदेव ह्मणे हे साधूचे लक्षण ॥ अंतकाळी आपण पहावेगीं ॥४॥ याप्रमाणे मला आता माझ्या नाकाचा शेंडा काही दिसत नाही. अंतकाळ समीप आला जन्म आणि मृत्यु देहाला आहेत. आत्म्याला काही नाही. तो सच्चिदानंदवनस्वरूपी केवळ साक्षी या रूपानें आहे. भगवद्गीतेचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी देशी भाषेत तेराव्या शतकाच्या आरंभीच केला. भक्तिमार्ग वाढावा, गीर्वाण भाषेचा गंध नसणान्या हजारों ब्राह्मणांचा व दरोवस्त ब्राम्हणेतरांचा उद्धार व्हावा म्हणनच ज्ञानेश्वर अवतरले. इतके जरी झाले तरी भागवत धर्माचं तत्व महाराष्ट्रमंडळांतील आबालवृद्धांस व अचांडाळ लोकांस कळले नाही. एवढ्याकरितांच मी नित्य भागवताचें पुराण सांगितले. कोणत्याही जातीचा पुरुष असला आणखी त्याला संस्कताचा गंधही नसला तरी त्याने या मार्गाने आपला उद्धार करून घ्यावा. मी स्वतः काही नवीन सांप्रदाय घातला अशांतला प्रकार नाही. ज्ञानेश्वरासारख्यांचीच पावले मी उमटवीत गेला आहे. त्यांनी श्रीशंकराचार्यांचा कित्ता वळविला आहे. त्यांनी जातिभेदावर जिवोद्वार अवलंबून नाही तर केवळ ज्ञानावर किंवा भक्तीवर अवलंबन आहे, या औपनिषद सिद्धांताचाच जीर्णोद्धार केला आहे. वेदाचा अंत अर्थात् ज्याच्या पलीकडे वेद राहिला नाही, तोच वेदांत ह्मणतो की, कर्मकांड गहन मार्ग असून ब्रह्मज्ञान किंवा भक्ति हा मुलभ मार्ग आहे. मी कोणत्याही रीतीने शास्त्रातिक्रम केलेला नाही. ( गिरजाबाईस उद्देशून ) का, तुमची प्रयाणाची तयारी आहे किंवा कसें ! गिरजाबाई-चंद्राची प्रभा चंद्राबरोबर. कमलपुष्पाचा सुवास १४