पान:श्रीएकनाथ.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५६ श्रीएकनाथ. गावबा--महाराज, माझी पहिली वतनदारी मूर्खपणाची, परंतु आपले उच्छिष्ट भक्षण करून या बुद्धीला काही काही प्रेरणा उत्पन्न झाली आहे. आपल्यासारखी प्रसादयुक्त अक्षरे माझ्या लेखणीतून कशी निघतील ? ओव्या. माणमा श्रीसद्गुरु रामचंद्रायनमः ऐसें बोलतां हनुमंत ॥ संतोषला श्रीरघुनाथ॥ स्वानंदसुखें डुल्लत ॥पाठी थापटीत कपीची॥१॥ सवेंचि बोले रघुराजा ॥ सवेग उठी पवनात्मजा ॥ शीघ्रकरोनि यावें काजा॥ बंधुराजा उठवावे ॥२॥ स्वस्थ असो तुझे चित्त ॥ स्वस्थ असो तुझें जीवित ॥ अंगप्रत्यंग समस्त ॥ कपिनाथ निजविजयी ॥ ३॥ स्वस्ति असो तुजलागी ॥ कल्याण असो सर्वागीं ॥ सर्वदा विजयी जगीं। तनुसागी सुदृढ॥४॥ हनुमंता होई चिरंजीवी । तेही जीवित्व ज्ञानानुभवी॥ ज्ञान विज्ञान पदवी ।। तुझेनी व्हावी जगासी ॥५॥ आतां मी तुज देवों आशीर्वाद । तंव पूर्वीच तुझें बळ अगाध ॥ प्रतापकीर्ति अतिप्रसिद्ध ॥ ऐक सावध सांगेन ॥ ६ ॥ बाळपणी आकळिला भानु ॥ तंव वजे इंद्रे हाणितला हनु ॥ हनुमंत हैं नामाभिधानु । तैपासून तुज जालें ॥७॥ त्या रवीच्या धांवण्यासीं ॥ आले लोकपाळ वेगेसीं ॥ ख्याति लाविली तयांसीं ।। ऐक सावकाशी सांगेन ॥८॥ कुंठित जालें इंद्रवज्र।। शिवाचा शूळ जाला चूर ॥ वरुणाचे पाश समग्र॥ चकचूर पै जाले ॥ ९ ॥ तुज न बाधी वरुणपाश ।। दुसरा आश्रमी आश्रम पाश ॥ तिसरा कर्माचा कर्मपाश॥ तुज वीरेशा बांधीना ॥१०॥ - एकनाथ-वाहावा ! फार चांगलें. एका दिव्याने मालविलेला दुसरा दिवा लाविला तर पहिला कोणता हे कोणालाच सांगतां येणार नाही; त्याप्रमाणे माझ्या काव्यांत आणखी तुझ्या काव्यांत भिन्नता दिसणार नाही. गावबा, तूं जाऊन धर्माधिका-यांना मी बोलाविलें आहे ह्मणून सांगून घेऊन ये. त्यांना ह्मणावें आमचा प्रयाणकाल येऊन ठेपला. आपल्यास ताबडतोब बोलाविले आहे. (गावबा जातो)