पान:श्रीएकनाथ.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १५५ चंद्राचे मुख, नाक झणजे चांपेकळी नाही तर पोपटाची चोंच, ओंठ मणजे पोंवळे, दांत ह्मणजे मोती, भिवया ह्मणजे धनुष्ये, डोळे झणजे माशाचा आकार नाही तर कमळाच्या पाकळ्या, असें पाहिजे - तसे होते. ह्मणन ह्मणतें ब्रह्मदेवापेक्षा कवीचे सामर्थ्य विशेष आहे. (गावबा रामायणाची पोथी वाचीत बसतो. हातानें कांहीं ओव्या लिहितो.। एकनाथ-(गिरजाबाईला एकीकडे बोलावून ) आतां आपल्याला या लोकीं राहून काय करावयाचे आहे ? सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे भागवत धर्माचा प्रसार आपल्याच्याने झाला इतका आपण केला. गिरजाबाई -आपल्यामागे आपण स्थापन केलेले जन्माष्टमांचे उत्सव, फाल्गुन वद्य षष्ठीचा उत्सव, दुसरे भजनकीर्तनाचे सोहाळे चालणार कसे ? हरि पंडिनाला काशीहून बोलावितां काय ? एकनाथ--मला वाटते तुला अजून मायेचें भ्रांतिपउळे आहे. अगे, हरिपंडित आपला मुलगा, आणखी हा गावचा दुस-याचा, हा भेदाभेद हवा कशाला ? तो काय देतो आणखी हा काय अंतरतो! गिरजाबाई मला मुळीच मायेचे भ्रांतीचे पडळ नाही. इतकी वर्षे संगतीला असून मला एवढे कळेना की काय की, मुलेबाळे म्हणजे धर्मशाळेत चार दिवस वस्तीला आलेले वाटसरू. वाटसरू निघून गेल्याचे दुःख जसे धर्मशाळेला नाही, किंवा दोनप्रहरच्या मावलीला घटकाभर बसलेली गुरे उठून गेल्याचे दुःख जसें आम्र याला नाही, तसेंच मी या लोकीचे वास्तव्य समजतें. माझ्याकडून बरोबर येण्याची तयारी आहे. एकनाथ- आपण फार गुप्त रीतीने आपले प्राणोत्क्रमण करावें असे मला वाटते. नंतर हा गावबा जाऊन गांवांत बातमी कळवील. आणखी धर्माधिकारी येऊन अग्निसंस्कार देतील. गिरजाबाई–पण आपण आरंभिलेल्या रामायणाची व्यवस्था काय ? ग्रंथ समाप्त होण्याच्या अगोदर आपल्याला जाणे योग्य दिसते काय ? HD भाएकनाथ-युद्धकांडाचा हा चव्वेचाळीसावा अध्याय समाप्त झाला. पंचेचाळीसाव्या अध्यायाची रचना गावबा करील. गावबा, चार पांच ओव्यांची रचना करून दाखीव म्हणजे इची खात्री होईलरे