पान:श्रीएकनाथ.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. CTET शिक आणि कपाळ ।। लखलखीत गंडस्थळें ॥ मुख सुकुमार कोवळें ॥ अधरप्रवाळे आरक्त ॥३॥ जैशा हिन्यांच्या ज्योती॥ की दाळिंबबीजांची दीप्ति ॥ तैशी मुखामाजी दंतपंक्ती ॥ दशन झळकती बोलतां ॥४॥ समान कर्ण दोन्ही सधर ॥ स्फुरत्कुंडलें मकराकार ॥ स्मितहस्य मनोहर ।। ग्रीवा सुंदर कंबु जैशी ॥५॥ एकनाथ-अरे तुला श्रीगणेशायनमः लिहितां येत नव्हता, आणखी तूं तर एकदम कवित्व बोलू लागलास ! हा परिणाम कशाचा झाला कळले कां तुला ? गावबा-महाराज, आपण मस्तकावर वरदहस्त ठेविल्यावर माझ्यासारख्या मूढाला ज्ञानप्राप्ति झाल्याशिवाय राहील काय ? एकनाथ-हा परिणाम माझ्या हाताचा नाही. तुला आतां देवघरांत ज्याने प्रेमाने जवळ घेतलें, तुझें मुख कुरवाळिलें, तुला कैवल्याचा अधिकारी केले त्याचा हा परिणाम आहे. गावबा-- ओव्या . कैवल्याचा अधिकारी ॥ मोक्षाची सोडीबांधी करी ॥ की जळाचिये परी॥ तळवट घे ॥१॥ ह्मणोनि गा नमस्कारू॥ तयाते आह्मी माथां मुकुट करूं ॥ तयाची टांच धरूं ।। हृदयीं आझी ॥२॥ तयाचिया गुणांची लेणीं ॥ लेववू आपुलिये वाणीं ॥ तयाची कीर्ती श्रवणीं ॥ आह्मी लेऊ॥३॥ तो पहावा हे डोहळे ॥ ह्मणोनि अचक्षुसी मज डोळे ॥ हातींचेनि लीलाकमळे ॥ पूजूं तयातें॥४॥दोवरी दोनी ॥ भुजा आलों घेऊनी ॥ आलिंगावया लागुनी ॥ तयाचें आंग ॥५॥ एवढा अधिकार जर भगवान आपण होऊन आपल्यासारख्या संतांना देतो आहे, तर मी असें समजतों की, देवाने दिलेल्या आलिंगनापेक्षा आपल्या हाताच्या ठिकाणी जास्त गुण आहे असे समजले पाहिजे. गिरजाबाई-आतां हा कवि झाला. याची कल्पना वाटेल तशी धाव मारते. कवि हे ब्रह्मदेवापेक्षा जास्त आहेत. कसे ह्मणाल तर ब्रह्मदेवाच्या कृतीत मुख तें मुखच, कमल तें कमलच, असा नियम आहे. पण कवीच्या सृष्टीत मुखाचें कमल, कमलाचे मुख,