पान:श्रीएकनाथ.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १५३ वैराग्यसंपन्न मुनिजनांस परमपूज्य, आणि युगायुगांच्या ठायीं जिची प्रसिद्धि, अशी जी भागीरथी, ज्याच्या चरणापासून उत्पन्न झाली, त्याने माझ्या घरी ब्राम्हणजनकी करून पंक्तीत पाणी वाढलें ! अट्टयायशी सहस्र ऋषि ज्याचें अर्चन करितात, त्याला सहाणेवर गंध घासावयास लाविलें ! लक्ष्मीसहित अष्टमहासिद्धि ज्याच्या दासी आहेत, अशा पांडुरंगाला मी आपल्या घरी फुलांचे हार गंफावयाला लाविलें ! ज्याच्या तेजानें चंद्र सूर्य तारे प्रकाशमान होतात, अशा प्रभूला दिव्यांच्या वाती सारण्यास लाविलें ! प्रथम विठ्ठल नाम धारण करून बारा वर्षे माझ्या मागे ध्रुपद धरिलें, नंतर केशव नांव धारण करून बारा वर्षे भागवत श्रवण केलें, आणखी आतां बारा वर्षे रुष्ण श्रीखंड्या नांवाने बाह्मणजनकी केली ! किती मी टुष्ट ! ! देवाला किती कष्टविलें ! आतां या लोकी राहून काय करावयाचे आहे! ( मूर्छित पडतो. गावबा व गिरजाबाई प्रवेश करतात.) गावबा-महाराज, काय मी धन्य ! केवढी माझी पुण्याई ! आज मला आपल्या कृपेनें प्रत्यक्ष भगवंतांचे दर्शन झाले. मी आणखी आईसाहेबांनी चरणावर लोळण घेतली. एकनाथ--(सावध होऊन) तुझांला देव कसा दिसलारे ! ( एकनाथ गावबाचे मस्तकावर हात ठेवतो.) गिरजाबाई-आकाशाच्या रंगाप्रमाणे अथवा निळ्या कमळाप्रमाणे शरीराचा वर्ण होता ! प्रसन्नवदन होतें ! पाहिल्याबरोबर अंतःकरणांत आनंदाचे भरतें येऊन नेत्रावाटे अणूंचे पूर वाहूं लागले ! कमळाच्या पाकळ्याप्रमाणे नेत्र विशाळ होते ! भाषण करतांना हिन्याच्या ज्योतीप्रमाणे दांत झळकत होते ! ओंठ पोवळ्याप्रमाणे आरक्त होते ! कारे गावबा, तुला भगवंतांनी चारी भुजा पसरून आलिंगन दिले ! तूं सांग तर भगवंताचे स्वरूप कसे होते ? गावबा- ओव्या. जैशी विशाळ कमळदळे ॥ तैसे आकर्णान्त दोन्ही डोळे॥ भिवया रेखिल्या काजळें ॥ तैसी रेखाकळे धनुष्याकृति ॥१॥ कपाळ मिरवत सावळे ॥ त्याहीवरी चंदन पिवळे । माजी कस्तुरीची द्वयअंगुळे ॥ कुंकुममेळे अक्षता ॥ २॥ दीर्घ ना