पान:श्रीएकनाथ.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ श्रीएकनाथ. आलो. एकूण तोच श्रीखंड्या यांत काही संशय नाही! त्याने मला ज्ञानाच्या गोष्टी किती तरी सांगितल्या. पण मला चतुर्भुज मूर्तीचे दर्शन झाले नाही. (गिरजाबाई प्रवेश करते. ) गिरजाबाई देवघरांत नाहीसा झाला. गंध उघाळावयाचे काम अर्धच टाकले आहे. आणलेली कावड तशीच भरलेली आहे. नारायणा ! आम्ही किती अभागी ! आम्हा अनाथाला एकाएकी सोडून गेलास असा आम्ही तुझा अपराध तरी कोणता केला होता ? मला प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. एकनाथ--भटजीबुवा, तुम्ही माझ्याबरोबर या.(उभयतां जातात.) गाववा--श्रीखंड्या ठक विद्युत खरोखर अट्टल आहे! मी एवढा महाठक, पण मला तूं ठकविलेंस. आईसाहेब मला असे वाटते की, या भटजीला खूप मार द्यावा. या दुष्ट मनुण्याने आपला सर्वस्वी घात केला (ब्राह्मण व एकनाथ प्रवेश करतात.) ब्राह्मण--शंक चक्र गदा पद्म लीलेने हस्तांत धारण केलेले आहे ! दैदीप्यमान् मुकुट मस्तकाच्या ठायीं विराजमान झालेला आहे ! मकरारुति कुंडलें कानांत तळपत आहेत ! पिवळा पीतांबर, ज्याच्या तेजानें सूर्याला सुद्धा उणेपणा आणिला, तो प्रभ नेसलेले आहेत ! कंटाच्या ठिकाणी कौस्तुभ आणखी वैजयंती, हृदयावर श्रीवत्सलांछन, असा सावळा सुंदर, मनोहर, वैकुंठराणा आज मला तुमच्या रुपेनें दिसला. माझें काम झाले. आता मी जातो. (जाता. गावबा व गिरजाबाई पडद्यांत जातात. एकनाथ त्यांना देवधरांत जावयास खूण करतो.) एकनाथ--जो ब्रह्मादिकाला पूज्यमान, ज्याचे शिवादिक चरण वंदन करतात, अशा देवाला मी आपल्या घरी पाणी वाहावयाला लाविलें ! ज्याचे वर्णन करतांना वेदशास्त्रे पुराणे वेडी झाली, त्याला मी आपल्या घरी ब्राम्हणांची उष्टी काढावयास लाविलें ! क्षीरसागरांत प्रभाकर बेटावर जो शेषावर शयन करणारा, अशा देवाला मी नीचाने आपल्या घरी बिछाने पसरण्याचे काम सांगितले ! ज्याच्याकरितां योगीजन अष्टांग योगसाधनें करितात, त्याला मा उपकर्णी घासावयास लाविलें ! प्रचंड नदीनद्यांची केवळ जननीच,