पान:श्रीएकनाथ.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक पवा. -१५१ वैकुंठाला नेऊन बसविलें. आपल्या उपकाराचा देवाच्या मस्तकावर इतका भार झाला आहे की, देव आपल्या केवळ मुठीत आहे. प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्ण आपल्या घरीं श्रीखंड्या नांव धारण करून कावडीने पाणी भरीत आहे ! त्यामुळे अष्टमहासिद्धि आपल्या घरी राबत आहेत ! कृपा करून मला श्रीखंड्या बाह्मणास भेटवा. एकनाथ--महाराज, काय ! बोलतां काय ! श्रीखंड्या ब्राह्मण प्रत्यक्ष श्रीकृष्णाची मर्ति ! ब्राह्मण यांत काय संशय ! मी द्वारकेहून आलो. मला जगमाता आदिमाया श्रीरुक्मिणी देवी इनें काय सांगितले आहे आपल्यास सांगतो. ( कानांत सांगतो.) एकनाथ हें काय मी ऐकतो आहे ! हे सत्य असेल काय ? श्रीखंड्याला हाक मारा. गावबा जारे. (गावबा जातो.) गिरजाबाई-काय बाई नवल ! मी अभागिणीने त्याला किती तरी छळला ! नाना प्रकारची हलकी सलकी कामें त्याला करायला सांगितली! पाणी तर तो आणीतच होता. छत्तीस वर्षे भगवान् आमच्या घरी निरनिराळ्या रूपाने होते; परंतु वांझेला जसे पुत्रमखाचें सुख नाहीं, अथवा जात्यंधाला जसा सूर्य दिसत नाही, तसे आझाला ते समजले नाही. किती आह्मी हतभागी !! ( गावबा प्रवेश करतो.) गावबा-महाराज, श्रीखंड्या पळाला ! त्याला पकडण्याबद्दल कोतवालाकडे वर्दी देऊ का? आपल्या घरांतील त्याने काही नेले नाहींना ? पहा बोवा. गिरजाबाई--मी एकदा स्वतः पाहून येते. आपल्या देखत तो आतांच कावड घेऊन देवघरांत गेला. आणखी म्हणाला झालें आतां पाणी ही शेवटचीच खेप. खरोखरच शेवटची. (श्रीखंड्याला हांका मारीत जाते.) ब्राह्मण--आतां कावड घेऊन गेलेला तर श्रीखंड्याचा स्नेही ! त्याचें नांव माधव असे त्याने मला सांगितले. तो ह्मणाला की मी श्रीखंड्याला धाडून देतो. तुम्ही किंचित् बाहेर उभे रहा असें त्याने मला सांगितले. बाहेर उभा राहून राहून मी कंटाळलो. मग मी आंत