पान:श्रीएकनाथ.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. होतील. आपण मला आज प्रत्यक्ष गुरुच भेटलां. कारण आपल्या कृपेनें आज मला परमेश्वर भेटणार आहे. (उभयतां जातात. पडदा उघडतो. एकनाथ रामायणाची पोथी लिहीत बसला आहे. जवळ गिरजाबाई व गावबा उभे आहेत. श्रीखंड्या पुनः प्रवेश करतो.) कि एकनाथ-अरे श्रीखंड्या, ऐन उन्हांतून पाणी आणू नकोसरे, तुला किती वेळा सांगितले ? आज उत्सवाला पाणी लागणार तरी किती, आणखी तूं आणणार तरी किती ? श्रीखंड्या -झालें, आतां ही शेवटचीच खेप महाराज. आतां देवघरांत जाऊन गंध उगाळून ठेवतों ( जातो.) गिरजाबाई–सान्या साऱ्या जन्मांत श्रीखंड्यासारखा मनुष्य पाहण्यांत काही आला नसेल. मटलें माझे मनांत याचे लग्न आपल्या घरी व्हावें. इकडून कोणावर शब्द टाकला तर कोणीही मुलगी देईल. गावबा-आणखी त्याच्याबरोबर माझ्याकरितां आपण शब्द टाकला तरगिरजाबाई -तुला थोडें शहाणपण येऊंदे. गाववा-आणखी आठ पंधरा दिवस दम खातो, कारण सध्या फाल्गुनाचा महिना चालला आहे. आज वद्य षष्ठि आहे. फाल्गुनाचा महिना गेल्यावर शहाणपणाचा महिना येईल. (ब्राम्हण प्रवेश करतो.) ब्राह्मण-(एकनाथाच्या पायां पडतो.) महाराज, गाववा-(एकीकडे ) ही बहुतकरून श्रीखंड्याला नवरी चालून आली असावी असे मला वाटते. एकनाथ--कोठे असतां महाराज ! आपल्याला कशाची अपेक्षा आहे ? " ब्राह्मण-महाराज, आपला केवढा अधिकार ! भगवंताचें कीतन करण्याचे ऐवजी आपल्यासारख्या भक्तांचें जरी नामस्मरण केले तरी भवबंधन तुटन जाईल. कारण देव निराकारी, आणखी बिन नांवाचा; परंतु भक्तांनी देवाला आकाराला आणून नामरुपाला आणिला. आपल्यासारख्या भक्तांनी देवाची प्रतिष्ठा वाढवून त्याला