पान:श्रीएकनाथ.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १४९ की निःशेष काम त्यांचा हरिला ॥ न विचारितां या बोला। कृष्ण व्यभिचरला मूर्ख ह्मणती ॥३॥ ब्राम्हण--हर हर ! आमी अज्ञानजन त्या अनंत अद्वय निर्विकल्प प्रभला किती तरी ग्राम्य आणखी अश्लील दृष्टीने पाहतों ! श्रीखंड्या-कपिलगीतेंतील तृतिय प्रसंग काय आहे बरें ! आत्मा हाच रुष्ण, सद्भाव हा नंद, प्रवृत्ति ही यशोदा, निवृति ही देवकी, देह हे गोकूळ, धैर्य हे अंगण, विकल्प हे दैत्य, अविद्या ही पूतना, अनुहत ही मुरली, दया, क्षमा, शांती ह्या गोपिका, त्रिकूट हे वृंदावन, उन्मनी ही राधा, आणखी आदिमाया ही रुक्मिणी. सारांश भगवान् श्रीकृष्ण पूर्ण निर्विषयी असून त्यांनी सकाम गोपिकांस देखील निष्काम केले. राधाकृष्णाचे प्रेम ह्मणजे भजकभज्याचे, आत्मापरमात्म्याचे, अथवा जीवशीवाचें प्रेम ! भक्ताच्या अंतःकरणांत न राधेच्या प्रेमाची ज्योत प्रकाशते तेव्हां चित्प्रकाश व भगवत्साक्षाकार तेथें सहज होतो. या परम मंगल प्रेमास विषय मानणारे लोक अत्यंत हतभागी समजले पाहिजेत. ब्राम्हण--या तुमच्या भाषणाने माझ्या हृदयांत दिव्य प्रकाश पडला. आजपावा मी ह्मणजे या गोष्टींनी परमेश्वराची महती कमी आहे असें बिलकुल समजत नव्हतों; परंतु आपल्या भाषणानें माझी संशयनिवृत्ति पूर्ण झाली. श्रीखंड्या -अहो, कुब्जा काय सुंदर होती का? ह्मणतात देव तिच्या ठायीं रत झाला ! ह्मणजे काय विषयासक्ती का ? जसा सुदामाच्या पोह्याला झटला, द्रौपदीच्या धावण्या धांवला, प्रल्हादाकरितां स्तंभ फोडून बाहेर आला, तसाच तो कुब्जेकरितां धांवला. तिची भक्ति तिला कामास आली. गोकुळांत काय दुष्काळ पडला होता, किंवा श्रीकृष्णाला खावयाला मिळत नव्हते ? ऋषिपत्न्या अन्न घेऊन गेल्या, ह्मणजे काय तर त्यांच्या भक्तीला देव भुलला. दुसरें काय ! पांडवांच्या बापाचें कांहीं तीन चवल लागत होता काय ? पण त्याची घोडी धुतली. तस्मात् भक्तीशिवाय गोष्ट नाही. ब्राह्मण-माझी आतां बालंबाल खात्री झाली. आतां रुपा करून मला त्या श्रीखंड्याकडे घेऊन जा. ह्मणजे माझे मनोरथ पूर्ण