पान:श्रीएकनाथ.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ब्राह्मण-श्रीखंड्या कोण आहे हे जर मी तुझांला सांगितले तर तुझांला वेड लागेल वेड. त्याला तुझी पाहिल्याबरोबर बसल्या जागीच तुमची समाधि लागेल. श्रीखंड्या-तर मग सांगाच हो मला श्रीखंड्या कोण आहे तो? ब्राह्मण-तुमचा कान इकडे करा. ( कानांत सांगतो.) श्रीखंड्या--अरेरे घात झाला. मी त्याच्या संगतीला इतके दिवस राहून फुकट घालविले. असो आपले नशीब, पण कायहो भटजीबुवा, तुम्ही त्याला आणखी व्यभिचारी म्हणतां तें कसें बरें ? ब्राह्मण-त्याने गोकुळांत चोऱ्या केल्या, आहे तुम्हाला कबूल ? श्रीखंड्या-कबूल. पण कसल्या चोऱ्या ? कोधाच्या अर्गळा काढल्या, भ्रांतीची कवाडे उघडून अज्ञानाच्या खिळा काढल्या. मायेची कुलपे तोडली. दंभाचे डेरे फोडिले. प्रपंचरूपी ताकाचा सडा केला. अहंकाराचा घुसळखांबा उपटून टाकिला. संचित हेंच शिळे लोणी त्याची धूळधाण केली. संकल्पविकल्पांची दुधाणी फोडली. प्रारब्ध हेंच शिळे दही खाऊन टाकिलें. क्रियमाण में दूध तें तोंडांत ओतून घेतलें सूचित आणि दुश्चित या तुपाच्या घागरी भरलेल्या होत्या त्या बाहेर फेंकून दिल्या. गवळणींची मायेची वस्त्रे, द्वैताची लुगडी होती, ती फेडून टाकली. आपआपणाला विसरल्या. कृष्णरूपी मिळून गेल्या. याला चोरी झणणे ह्मणजे कापराच्या काजळीने आकाशाला काजळाची पुढे देत बसणे अथवा मृगजळांत तारूं हाकारण्याप्रमाणे आहे. ब्राह्मण--कायहो, तुम्हाला इतकें ज्ञान कसें प्राप्त झाले हो ? श्रीखंड्या -नाथमहाराजांच्या संगतीने. दुसरे काय ? ब्राम्हण-बरें पण कृष्ण व्यभिचारी नाही, हे मला सिद्ध करून दाखवाल काय ? श्रीखंड्या--जळचरांना ज्याप्रमाणे महासागराचा अंत लागत नाही, मशकाला ज्याप्रमाणे आकाश आक्रमून जातां येत नाही अथवा गर्भ ज्याप्रमाणे आपल्या मातेच्या वयाला जाणत नाही, त्याप्रमाणे प्रत्यक्ष महर्षीना ज्या परमेश्वराचा पत्ता लागत नाही, ज्याने बाळपणची कोमलता नष्ट झाली नाही तोच म्हणजे पांच वर्षांचा असतां