पान:श्रीएकनाथ.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ श्रीएकनाथ. श्रीखंड्या--चांगला सुखाने एकनाथाच्या घरी होतो, पण आलें, काळाचे बोलावणे आले. हा ब्राम्हण एक माझा दावेदारच आहे म्हणावयाचा. बाम्हण मोठे हट्टी. त्यांच्यापुढे माझें कांहीं चालत नाही. असो, आतां बोलून काय उपयोग ? ब्राह्मण-अहो दादा, मला नाथमहाराजांचे घर दाखविण्याची रुपा कराल काय ? श्रीखंड्या-कशालारे बाबा ? ब्राह्मण-तेथें एक श्रीखंड्या नांवाचा ब्राह्मण त्यांच्या घरी पाणी भरीत असतो त्याला भेटावयाचे आहे. श्रीखंड्या-श्रीखंड्या तर माझा मोठा जिवलग मित्र आहे. तो आणखी मी जोडीनेच त्यांच्या घरी पाणी भरीत असतो. माझें नांव माधव. पण कायहो महाराज, त्याच्याशी तुमचे काय काम आहे ते मला रुपा करून सांगाल काय ? पण फार गुप्त असल्यास नका सांगू. ब्राह्मण-गुप्त झणजे इतके आहे की, जसा कपड्यांत बांधून विस्तव ठेवावा किंवा गारेच्या ढिगांत हिरा लपवावा, किंवा भांगेत तुळस लपवावी, किंवा वेड्यांत पंडित लपवावा, किंवा पाखांड्यांत साधु लपवावा त्याप्रमाणे झाले आहे. अहो, तो श्रीखंड्या ब्राह्मण ह्मणजे प्रत्यक्ष श्रीखंड्या-चोर आहे की काय ? तरीच बरें मला त्याचा अनेक वेळां संशय आला, पण मी आपला काही बोललो नाही. ब्राह्मण-चोर तर तो आहेच, पण त्याशिवाय श्रीसंड्या-झणजे चोरीपेक्षा मोठा आरोप त्याच्यावर आहे की काय! ब्राह्मण-चोरीपेक्षा जबरदस्त आरोप त्याच्यावर 'व्यभिचारी' असा आहे. आणखी जे लोक त्याच्या व्यभिचाराचे वर्णन करितात त्यांची गणना अत्यंत शहाण्या लोकांत केली जाते. प्रत्यक्ष शुकाचार्याने सुद्धा त्याच्या व्यभिचाराचे मोठ्या प्रेमानें वर्णन केले आहे. श्रीखंड्या--श्रीखंड्या व्यभिचारी ! हे मी आजच ऐकतो. तुमचे जवळ काही प्रत्यक्ष प्रमाण आहे काय असें ह्मणावयाला !