पान:श्रीएकनाथ.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १४५ एकनाथ--श्रीखंड्या, मला असे वाटते की, आपण ही रक्कम गरीब लोकांना धर्म करून टाकावी. हल्ली येथे भयंकर दुष्काळ पडलेला आहे. अशा वेळी आपण त्यांना पैशाची मदत केल्यास परमेश्वर संतुष्ट होईल. याचप्रमाणे करावयाचें. ठरला बेत. चला आतां आपण पैठणाचा मार्ग धरूं, (जाले ज्ञानदेव वाणी, हा अभंग म्हणत जातात.) प्रवेश ४ था. स्थळ-पैठणांतील रस्ता. (एक ब्राह्मण प्रवेश करतो.) ब्राह्मण--(एकीकडे ) आज बारा वर्षे झाली द्वारकेंत भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावें ह्मणून मी तपश्यया करीत बसलो होतो. शेवटी मला दृष्टांत झाला. जगन्माता देवी रुक्मिणी इ. स्वप्नांत येऊन असे सांगितले की, भगवान् द्वारकेंत नाहीत. तूं विनाकारण आपल्या जिवास कष्ट कां देतोस ! मी प्रत्यक्ष त्यांची अर्धांगी ह्मणविते पण आज छत्तीस वर्षे होत आली, भगवंतांनी माझें तोंड पाहिले नाहीं. प्रथम बारा वर्षे एकनाथाच्या मागे देवानी ध्रुपद धरिलें. एकनाथास माहीत नाही. नंतर बारा वर्षे एकनाथाच्या मुखानें भागवत श्रवण केलें. एकनाथाने जाणिलें नाही. आतां बारा वर्षे होत आली, एकनाथाच्या घरी कृष्ण श्रीखंड्या या नावाने पाणी भरीत असतात. तला दर्शन घेण्याची इच्छा असल्यास तूं पैठणास जा. श्रीखंड्याचा शोध एकनाथाच्या घरी कर, म्हणजे तुला प्रत्यक्ष दर्शन होईल.ज्या अर्थी प्रत्यक्ष भगवान् एकनाथाच्या घरी स्वतः राबत आदेत. त्या अर्थी दुसरे देवही अन्य रूपाने राबतच असतील. असे देवी रुक्मिणीने मला सांगितले. माझ्या नव-यास असा निरोप सांगा म्हणून सांगितले आहे की,-आपण तरी द्वारकेस या नाहीतर मी तरी पैठणास येतं. आपण नाथाच्या घरी पाणी भरा. मी भांडी घासीन, चूल पोतेरें करीन, नाहीतर नाथाच्या बायकोची बाळंतपणे करीन. (श्रीखंड्या प्रवेश करतो.) १३