पान:श्रीएकनाथ.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ श्रीएकनाथ. गाववा--मला वाटते, त्या कानड्यावाण्याकडून मी आणखी कापड घेतले असते तर बरे झाले असते. मी आपल्याला धोतरजोडा सुद्धा घेतला नाही. (डोळे चोळतो. ) एकनाथ--गावबा, तुला वाईट वाटण्याचे कारण काय ? तुला काय त्या वाण्याने फसविलें होय गाववा--मींच त्याला फसविलें. पण आणखी फसविलें नाहीं म्हणून वाईट वाटते. तो पळून जाणार असें जर मला अगोदर कळर्ते तर हजार पांचशे रुपयांचा माल तरी घेतला असता. एकनाथ-~-मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. श्रीखंड्या, हा काय म्हणतो आहेरे ? । श्रीखंड्या --महाराज, तो कानडा वाणी खरोखर ज्ञानेश्वरमहाराजच होते. मी अगोदरच भविष्य केले होते, पण त्या वेळी आपल्यास भुरळ पडल्याप्रमाणे झाले. हजारों रुपयांचे सामान म्हणजे कापडचोपड, दागदागिने, वाटेल तो माल त्याने आपल्या पैठणकर मंडळींना उधार दिला. आतां आज आपण जाणार आहों हे त्याला कसे समजले कोण जाणे. परंतु आज सकाळपासून तो एकाएकी नाहीसा झाला आहे. त्याचे नौकर चाकर एक सुद्धा जाग्यावर नाही. आतां त्याच्या पैशाचे काय करावें ! पैसे द्यावे कोणाला ? गावबा--मला द्यावे. ह्मणजे मी लग्न करीन आणखी दहा पांच हत्ती बाळगीन. एकनाथ-अहाहा ज्ञानेश्वरमहाराज ! तुम्ही आह्मां दीन जनाकरितां किती तरी हे श्रम घेतलेत ! अभंग जाले ज्ञानदेव वाणी । आले सामुग्री घेऊनी ॥१॥ पर्वकाल द्वादशी । दिली सामुग्री आह्मासी ॥२॥ ज्ञानदेवाच्या चरणीं ॥ शरण एका जनार्दनीं ॥३॥ श्रीखंड्या-महाराज, आतां या पैशाचें काय करावयाचे ! जवळ जवळ लाख रुपयांची रक्कम माझ्याजवळ येऊन पडली आहे. गावबा-मला वाटते, सर्व पैसे नदीच्या डोहांत टाकून द्यावेत, झणजे बिचाऱ्या माशांचे पोट तरी भरेल.