पान:श्रीएकनाथ.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। अंक ५ वा. १४३ सांगं शकत नाहीत. त्याला त्रैलोक्याचे तीर्थाटण घडलें. वैकुंठ त्याने आपले राहतें घर केलें. वाराणसीच्या यात्रा त्याने असंख्य केल्या. त्याने अगणित लक्ष भोजनें घातली. मेरुपर्वतासमान त्याने सुवर्णाचा धर्म केला. कोट्यानकोटी साधूंचे दर्शन त्याला घडलें, वाचक अथवा श्रोता नष्ट चांडाल दुर्जन असेल, परद्वारी गमन करणारा मात्रागमनी, तस्कर, सुरापान करणारा, मित्रद्रोही, कतन्न, असा जरी असला, तरी गीतेच्या आवर्तनाने त्याला मुक्ति खास मिळेलच, असें श्रीशंकराने पार्वतीला सांगितले आहे. तूं आतां पैठणास जा तुझा कार्यभाग झाला. (एकनाथाच्या मस्तकावर हात ठेवितात. पोथी हवाली करितात. पुष्पांची माळ आपल्या गळ्यांतील त्याच्या गळ्यांत घालतात.) एकनाथ-- अभंग. संताचा महिमा वर्णावा किती ॥ अलक्ष लक्षमूर्ति ज्ञानोबा तो॥१॥ अर्जुना संकट पडतां जडभारी ॥ गीता सांगे हरि कुरुक्षेत्रीं ॥२॥ तोची अवतार धरी अलंकापुरीं ॥ ज्ञानदेवसुंदर तारावया ॥३॥ गीता शोधोनिया अर्थ तो काढिला ॥ ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी ॥४॥ जगाचा उद्धार ज्ञानदेवनामें ॥ साधन हे आणिक नेणे न करी कांहीं ॥ ५॥ एका जनार्दनी ज्ञानदेव नाम ॥ पावेन निजधाम संतांचे ते ॥६॥ ( एकनाथ भुयाराचे बाहेर येतो. पडदा पडतो. श्रीखंड्या, गावचा व कित्येक टाळकरी प्रवेश करितात.) श्रीखंड्या -महाराज, काय हे आपले जाणे! आठ दिवस आपण तेथें करीत होतां तरी काय ? एकनाथ-आठ दिवस ! काय बोलतोस तरी काय ! मला वाटते फार झाले तर मी चार घटका आंत राहिलों असेन. एकूण संतांच्या संगतीने जर एक वर्ष घालविलें तर एका दिवसाप्रमाणेच बाटावयाचे, यांत कांही संशय नाही. असो. तुमची पैठणास जाण्याची आतां तयारी आहे काय ? श्रीखंड्या --महाराज, आमच्याकडून काहीच हरकत नाहीं. आमची निघण्याची आतां तयारी आहे.