पान:श्रीएकनाथ.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५वा. १४१ जातात. पडदा वर होतो. एकनाथ भुयारांत श्रीज्ञानेश्वराच्या समीप जातो.. ज्ञानेश्वराचा दिव्य प्रकाश पडतो.) एकनाथ--(साष्टांग प्रणिपात करून उभय हस्त जोडून ) महाराज ज्याप्रमाणे गंगेला थिल्लरोदकाचा अभिषेक, अथवा अमृताला गळाचा नैवेद्य, अथवा सूर्याच्यापुढे दिव्याचा प्रकाश, त्याप्रमाणे मी केलेली स्तुति आहे. ओव्या. ॐनमो श्रीज्ञानेश्वरा ॥ आदिनाथ निराकारा ॥ तुझिया क संसारा ॥ तरलों यथा ॥१॥ तूं तत्वज्ञानवेत्ता ॥ तूं सकळ योगियां सिद्धिदाता ॥ तूं मूर्तिमंत ज्ञान तत्वता ॥ भूतहृदयीं ॥२॥ आविद्येचे अविद्यापण गेलें ॥ आणि मायेचें मायिकत्व मावळलें ॥ दोन्ही विरोनि जे ठेलें ॥ ते तूचि होसी ॥३॥ तूंचि भवसिंधूचे तारू ॥ तुझोनि नामस्मरणे साचारू ॥ देखती पैलपारू ॥ अज्ञान जीव ॥४॥ ज्ञानेश्वर ही चार अक्षरें ॥ जो जप करी निर्धारें ॥ त्यासी ज्ञान होय सत्वरें ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥ ५॥ महाराज, मी कृतार्थ झालो. आज मला श्रीगुरुजनार्दन स्वामी यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. अनंत जन्मीं कर्म, उपासना, तप, योग, जप, अनुष्ठान आणि साधूंची केलेली सेवा इत्यादिकांचे पुण्य आज मला मूर्तिमंत दृष्टीस पडले. स्वप्नामध्ये सूर्यासारखा तेजस्वी, मदनाप्रमाणे सौंदर्ययुक्त, कंठामध्ये तुलसीकाष्ठमाला आणि कपाळी मुद्रांकित गोपीचंदन लावून मुखानें श्रीविठ्ठल या नामाचा उच्चार करीत आलेले आपण मला प्रत्यक्षच दिसला. (श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या कंटास वेढा घातलेली अजानवृक्षाची मुळी काढून बाजूला लावतो.) श्री ज्ञानेश्वर- श्लोक. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१॥ या भगवंताच्या उक्तीप्रमाणे तुझी उत्पत्ति झाली आहे. अज्ञानसपी अंधःकार तं नाहींसा केलास. साधूंचा मान वाढविलास. अविवेकाची काजळी विवेकाच्या दीपानें नाहींशी केलीस. आज