पान:श्रीएकनाथ.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० श्रीएकनाथ. एकनाथ--रोज आमच्याकडे श्री ज्ञानेश्वराच्या प्रसादाला येत जा बरें का. कानडा--महाराजांच्या प्रसादाचा लाभ मिळाल्यावर आणखी काय पाहिजे ? आपला मुक्काम किती दिवस होणार ! | एकनाथ--ज्ञानेश्वरमहाराजांचा मला असा दृष्टांत झाला आहे की, अजानवृक्षाच्या मुळीचे त्यांच्या कंठाला वेष्टण झार्ले आहे. समाधि उकरून तेवढी मुळी बाजूला केली, व समाधीचे काम मुस्तकीम तयार केलें की, आझी त्यांची आज्ञा घेऊन परत जाऊ. मग आतां या कामाला काय अवधि लागेल तो लागो. कानडा-आपल्यास ज्ञानेश्वरमहाराजांचा दृष्टांत झाला. आपण परम थोर आहांत. केवळ साधु आहांत. असो. महाराज, जातों मी आता दुकानाची तयारी करतो. ( एकनाथाच्या पायां पहून जासो.) श्रीखंड्या--पाणी लागेल तर मजकडून घेत जा हो. गावबा--भोजनाला ब्राह्मण घातलेत, आणखी दक्षिणा पुष्कळ असली, तर आह्मांला सांगा हो. एकनाथ-बरें, तुझी दोघे जा आतां बि-हाडी. सगळी सोय लावून ठेवा. समाधि उकरण्याचे काम कोठवर आले आहे ते मी पाहून येतो. (जातो.) श्रीखंड्या-चला गावबा. आह्मी आणतों पाणी आणि तुह्मी करा स्वयंपाक. पण कालच्यासारखे करूं नकोहो. नाही तर खिरीचा मसाला कढीत आणि कढीचा मसाला हिंगजीरे मीठ मिरच्याचे तुकडे वगैरे खिरीत ! साखर, वेलदोडे, बेदाणा, बदामाच्या कापा सगच्या कढीत तरंगायला लागल्या ! मी जरा बाहेर गेलों मात्र, तो माझ्यावर एवढा उपकार केलास. गावबा--पण एकनाथाला कांही ओळखता आले नाही. श्रीखंड्या--अरे नामामृताचें जो भोजन करणार, त्याला या असल्या जेवणाची चव कोठन असणार ! जे राजहंस नित्यशः मोHW त्यांचा चारा खाणार, त्यांच्यापुढे तुझ्या खिरीची चव काय ? बरे . चला आतां. तुह्मी फार शहाणे आहांत. आतां तर झाले ? ( उभयता