पान:श्रीएकनाथ.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १३९ तूप, साखर, मैदा, भाजीपाला, फळफळावळ, वैरणकाडी, कापडचोपड, काय पाहिजे तो माल माझ्याजवळ विक्रीस तयार असून, भावाला अगदी माफक आहे. पैशांची तक्रार पडणार नाही. कारण माझी खात्री आहे की, ज्या अर्थी आपण सर्व यात्रा करण्याकरितां आला आहां, त्याअर्थी माझे गरिबाचे पैसे खास खास बुडवून जाणार नाहीत. श्रीज्ञानेश्वरमहाराज तुह्मांला अशी बुद्धि देणार नाहीत. सारांश, पाहिजे तो माल माझ्याजवळून विकत घ्यावा. गाववा-मात्र पैसे मुळीच मागू नको, झणजे तुझ्यासारखा माणूस नाही. व श्रीखंड्या-तं तर आमाला प्रत्यक्ष पांडुरंगच भेटलास किंवा ज्ञानोबाच भेटलास. आह्मी आतां सगळे केवळ उपाशी मरणार होतो. काय करावें हे आह्मांस सुचत नव्हते, पण इतक्यांत तुला येथे येण्याची परमेश्वराने बुद्धि दिली. तूं आझाला परमेश्वर दिसतोस. कानडा--महाराज, तुह्मी तसाच मी. तुह्मांला जसे कोणी परमेश्वर ह्मणणार नाही, तसेंच मलाही कोणी ह्मणणार नाही. एकनाथ--तुझी आतां असें करा की, एक मोठे थोरलें दुकान मांडा. त्या ठिकाणी सर्व माल ठेवा. आमच्या लोकांकडून पैसे घेऊन लागेल तो माल त्यांना देत जा. तुमचे आमच्यावर अत्यंत उपकार झाले. या वेळी हजारों लोकांना तुझी जीवदान दिले. तुमच्यावर पांडुरंग रुपा करील. कानडा-महाराज, आपल्या पायाचा हा दास आहे. काय वाटेल तो माल सांगा, हजर आहे. मालाची किंमत आपण पैठणास गेल्यावर वर्ष सहा महिन्यांनी सावकाश पाठवून द्या. गावबा--मुळीच पाठवावयाची नसल्यास माझ्या आईकरितां एक छानदार लुगडे द्या, खणाविषयी मी काही बोलतच नाही. कानडा--एक सोडून दहा लुगडी घ्या महागज. एकनाथ--त्याच्या नादी लागू नका. तो आपला वेडसर आहे. कानडा--मला, असली रत्ने फार आवडतात. अहो, प्रत्यक्ष देव तरी गवळ्यांच्या पोरांबरोबरच खेळत होता.