पान:श्रीएकनाथ.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ श्रीएकनाथ. पंढरपूर त्याच्याहून याचा महिमा विशेष आहे. तात्पर्य, जन्मास आल्यासरसें निदान एकवार तरी अळंकापुरास जावें. मला वाटते, द्वापारयुगी श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, त्यावेळी इतर भाविक जनाला तिचा पूर्ण लाभ मिळाला नाही ह्मणूनच की काय, पुनः श्रीरुष्णांनी ज्ञानेश्वराचा अवतार घेऊन भावार्थदीपिका ह्मणजे ज्ञानेश्वरी आह्मां प्रारुतजनासाठी निर्माण केली. अजान वृक्षाची पानें भसून जो ज्ञानेश्वरीचे पठण करील त्यास ज्ञान प्राप्त झाल्याविना राहणार नाही. तीन सप्तकें जो श्रवण करील, तो ज्ञानसंपन्न होईल. भागीरथीप्रमाणेच जो इंद्रायणीत स्नान करील ता मोक्षपदाला जाईल. सिद्धेश्वराच्या दर्शनाने सहज कैवल्य प्राप्त होणार आहे. (दिंडीतील लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पडद्यांत जातात. गाववा व श्रीखंड्या प्रवेश करितात.) श्रीखंड्या-महाराज, आपण हजारों यात्रेकऱ्यांनी बरोबर घेऊन आलांत. या प्रांती तर सांप्रत दुष्काळ पडलेला आहे. लोकांना खावयास अन्न नाही. अन्नावांचून शेंकडों लोक तडफडून मरत आहेत. येथे काही सामान विकत मिळत नाही. आज दोन दिवस लोकांना फाके चालले आहेत. भाजीपाल्याचे तर नांवच नको. गावबा-पण नदीला पाणी मात्र पुष्कळ आहे. त्याजवरच तूर्त भूक भागवावी. दुसरे काय ? ज्ञानेश्वरमहाराजांची मर्जी ! माझी आई मला ह्मणत होती तुं इतका लांब जाऊं नको; पण मी हट्टानें ऐकले नाही. ( रडतो.) - श्रीखंड्या-(लांब पाहिलेसे करून ) पण हा पाहिला का बैलांचा तांडा. मला वाटतें पांचशें बैल असतील. हा कोणी तरी मोठा लमाण, नाहीतर व्यापारी वाणी वगैरे धान्य घेऊन इकडेसच येत आहे बरें का ? हे एक मोठे काम झाले ह्मणावयाचें. आपल्या मंडळीजवळ पैसे पुष्कळ आहेत, पण येथे पाहतों तो गांव सव उजाड पडलेला आहे. लोक सर्व बाहेरगावी निघून गेले. ( कानडा वाणी प्रवेश करितो.) कानडा-हजारों हजार यात्रेकरू आले आहेत, असे पाहून मी मुद्वाम सर्व प्रकारचा माल विक्रीकरितां येथे घेऊन आलो आहे.