पान:श्रीएकनाथ.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. त ब्राह्मण ह्मणवितां, धर्माधिकारी ह्मणवितां, ग्रामाधिपति ह्मणवितां, काय पाहिजे ते आपल्यास ह्मणवितां. अधिकाराच्या जोरावर । टुसऱ्याचा छळ करितां. परंतु जोंपावेनों कामक्रोधादि षड्विकारांचा त्याग केला नाहीत, जोपावेतों नामधारकाचा झणजे श्री एकनाथाचा द्वेष तुमच्या मनांतून गेलेला नाही, तोपावेतों तुह्मी परमेश्वर लवमात्र जाणिला नाही. तुमची क्रिया निष्फळ आहे. तुझी मुक्त होणार नाही. तुम्ही एकनाथाला शरण जा. म्हणजे तुमचाच काय, पण तुमच्या पुढच्या मागच्या शेंकडों पिढ्यांचा उद्धार होईल. तुम्ही जे जे एकनाथाला शाप दिले आहेत ते ते उःशाप देऊन नष्ट करा. रात्रंदिवस त्याची सेवा करा, कारण तो प्रत्यक्ष पांडुरंगाचा अवतार आहे. धर्माची ग्लानी झाली, त्याची पुनः स्थापना व्हावी, भागवत धर्माचा प्रसार व्हावा ह्मणून स्वतः ज्ञानेश्वरमहाराजांनी अवतार धारण केला आहे. ( सर्व विमाने वर जातात. विट्ठलना. माचा गजर होतो. दिव्यप्रकाश पडतो. धर्माधिकारी व सर्व ब्राम्हण एकनाथाला साष्टांगनमस्कार घालनात. अशा स्थितीत पडदा पडतो.) प्रवेश ३रा. स्थळ-अळंकापुरांतील श्रीज्ञानेश्वराचे देवालय, (एकनाथ विट्ठलनामाचा गजर करीत दिंडी घेऊन प्रवेश करतो.) एकनाथ-धन्य धन्य अळंकापूर ! ज्या ठिकाणी चौयायशी सिद्वांचा राजा श्रीज्ञानेश्वर नांदत आहे, अशा स्थळाला जो दृष्टीनें। पाहील, तो वैकुंठभुवनास केवळ टाळ्यांचा गजर करीत येईल. सर्व पूर्व-/ जांचा उद्वार करील. या अळंकापुरीचे काष्ठ-तृण-पाषाण-वृक्ष देवच आहेत. तेहतीस कोटी देव येथे पक्षी होऊन येतात येथील इंद्रायणी नदीत अस्थींचे पाणी होऊन जाते. पापी जनांचे पाप हरण करण्यास पंढरीहून हे सोपे आहे. कळीकाळ मोठा कोपायमान झाला, तरी अळंकापुरीस त्याचे काही चालावयाचें नाही. जे लोक आळंदीच्या यात्रेला जातात ते पांडुरंगाचे मोठे लाडके भक्त होत. भूवैकुंठ में