पान:श्रीएकनाथ.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ श्रीएकनाथ. यांचे पितर होऊन यावें. श्राद्धाचा क्षण आपणच घ्यावा. श्राद्ध यथासांग चालवून भोजन करावे हे ह्या दीनाचे चरणापाशी मागणे आहे. जयजनार्दन--जयजनार्दन--अहाहा, ही पहा पितरांनी भरलेली दिव्य विमाने आकाशमार्गे खाली उतरूं लागली आहेत. (जातो. धर्माधिकारी व ब्राह्मण प्रवेश करितात.) धर्माधिकारी-आज त्याची खूप फजिती उडाली. आतां त्याच्या घरी जाऊं. ब्राह्मणांची व्यवस्था काय केली ते मला पहाव. याचे आहे. त्याला पाहिला की, माझें पित्त खवळून जाते. या प्रसंगी तो माझ्या कचाट्यांत असा सांपडला आहे की, मी त्याचा कान धरून, त्याला वाटेल तसा वांक वीन. श्राद्धाचा स्वयंपाक महारांच्या पदरांत घालतो ! आतां कोण श्राद्ध चालवितो ते पाहूं या. त्रिविक्रम--चला आपण त्याच्या घराकडे जाऊं. आड बाजूला लपून बसूं. काय काय चमत्कार होतो तो पाहूं. मला वाटतें, बहुतकरून नवीन स्वयंपाकाची तयारी करून ब्राह्मणांची वाट पहात दारांत उभा असेल. पण पैठणांत याला ब्राम्हण मिळणार तरी कसा? आपण बोलत बोलत अगदी त्याच्या घराजवळ आलो. (पडदा वर होतो. विमानांत बसलेले पितर दिसतात. धर्माधिकारी-अरे, हे मी काय पाहतों आहे ! हे माझे बाबा! यांना मरून अजून वर्षसुद्धा झाले नाही, तों ते येथे कसे आले ! अहो बाबा-अहो बाबा त्रिविक्रम--आणखी माझे आजोबा हे तरी येथे कसे आले ? अहो आजोबा-अहो अजोबा धरणीधर--आणखी आमचे जेष्ठ बंधु अच्युतशास्त्री कसे आले ? अहो दादा-अहो दादा त्रिविक्रम--आणखी आमचे काका राघवेंद्राचार्य कसे आले ? अहो काका-अहो काका-(एकनाथ प्रवेश करतो. ) । पितर--अहो धर्माधिकारी ह्मणविणा-या ब्राह्मणांनो, आह्मी तुमचे प्रत्यक्ष बाप तुझांला काय सांगतों तें ऐका. तुह्मी त्रिकाल स्नानें करितां, वेदांत पारंगत झालेले आहांत. शास्त्राचे अध्ययन पूर्ण झालेले आहे. आपल्यास पंडित झणवितां, ज्ञानी ह्मणवितां, वेदो.