पान:श्रीएकनाथ.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. दृरिहर तृप्त होतात. असे अनंत ब्रह्मवेत्त्ये एका नामधारकाबरोबर । आहेत असे शास्त्रोक्त आहे. राण्या महार मोठा नामधारक आहे. भगवान त्याच्या घरी प्रत्यक्ष जेवले आहेत. तुह्मीं स्वतः पाहिले आहे. ह्मणून त्याला जेवायला घातले. शिवाय महारांचे मन या अन्नावर गेले होते. त्यांचे आत्मे भुकेने व्याकूळ झाले होते. धर्माधिकारी-तें कांहीं मी जाणत नाही. आतां पितरच आले पाहिजेत श्राद्ध चालवायला. त्याशिवाय तुझ्या घरी कोणी अन्न ग्रहण करणार नाहीत. हे आमी चाललों. ( सर्व ब्राह्मण जातात. ) एकनाथ--(बायको, श्रीखंड्या व गावबा यांना उद्देशून ) कांहीं हरकत नाही. आपलें अंगण सर्व झाडून सारवून पुनः तयार करा. सर्व जागा प्रथम धुवून काढा. सर्वांना स्नान करावयास सांगा. पुनः सर्व स्वयंपाकाची सिद्धता करा. हे असे होणारच. हे मी तला पूर्वीच सांगितले होते. असो, तुम्ही आपापल्या कामाला जा. (एकनाथ खेरीज करून सर्व जातात.) पांडरंगा. शंखासराचा जीव घेवलास पण त्याचे कलेवर जसें हातांत -- मिरवितोस, त्याचप्रमाणे माझ्या शरीरांत प्रवेश करून माझ्याही देहाला वागवितोस. माझ्या शरीराचे चलनवलन अथवा मी जी जी कमें करितों ती ती तुझ्याच सत्तेने होतात. माझ्या देहांतलें मीपण तंच आहेस. दृष्टीने जे जे काही पहातों, कानाने ऐकतों, जिभेनें चव घेतो, त्या पाहण्याच्या, ऐकण्याच्या, चव घेण्याच्या सर्व क्रिया तंच करतोस. मनाचें चपळपण तूंच आहेस. विवेकाने त्याचे आकलन करणारा तूंच आहेस. जागृति, स्वप्न, सुषुप्ति ह्या अवस्था तूंच आहेस. मला केवळ कळसूत्री भावल्याप्रमाणे पुढे केले आहेस; पण माझ्या हातून सर्व क्रिया करून घेणारा सूत्रधार तूंच आहेस. सुवर्णाचे भिन्न भिन्न अलंकार केले तरी ते ज्याप्रमाणे सुवर्णपणाला सोडीत नाहीत, अरुणोदय आणि सूर्यप्रकाश एकच, पक्षी आणि त्याचे पंख एकच, समुद्र आणि त्याच्या लाटा एकच, वाद्य आणि त्याचा नाद एकच, त्याप्रमाणे भक्त आणि देव आहेत. ज्या ज्या क्रिया भक्तांनी केल्या, त्या त्या देवानेच केल्याप्रमाणे आहेत. भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्याचे काम देवाचे आहे. या प्रसंगी आपण धर्माधिकारी शास्त्री, पंडित