पान:श्रीएकनाथ.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ श्रीएकनाथ. धर्माधिकारी-पृथ्वीप्रळय काळपावेतों रवरव नरकांत पडशील. तुला कुष्ट भरेल. तुला महारोग होईल. अंध होशील. पंगु होशील. पाषाण होऊन पडशील. आतां काय करूं ? काय बोलूं एकनाथ--परमेश्वरा, हे आकाश जरी माझ्यावर कोसळून ७ पडलें अथवा हा ब्रह्मांड गोल जरी फुटून गेला तरी हरकत नाही. पण प्राणीमात्रावर सारखीच ममता करण्याची बुद्धि मला दे. धर्माधिकारी-आतां तुझ्या बापाचे श्राद्ध महारांकडूनच करीव. आतां ब्राह्मणपणास मात्र तूं खास खास आंचवलास. क्रोधाने माझें मस्तक भणाणून गेले आहे. वाटते की, तुझ्या नरडीचा घोट घ्यावा. एकनाथ—फार चांगले आहे महाराज. या देहाचें सार्थक झालें, असें मी समजेन. सत्कार्यो देह पडला यापेक्षा अधिक काय पाहिजे. हं आटपा लवकर. टाका मला खाऊन. ( पुढे सरतो. ) - धर्माधिकारी-शिवू नको मला. लांबून बोल. तूं चांडाळ आहेस. अरे श्राद्धाचा स्वयंपाक महारांना खावयास घातलास, आतां श्राद्ध होणार कसें! एकनाथ-कांही हरकत नाही. सर्व स्वयंपाक नवा करवितों. सर्व जागा सारवून काढतो. पुनः स्नान करून सर्व स्वयंपाक नवा । करून श्राद्ध करूं ह्मणजे झालें. धर्माधिकारी-आतां जर हाडाचा ब्राह्मण असशील तर आमच्या पितरांना घेऊन ये जेवायला. बाकी आमच्या जिवांत जीव आहे तोपर्यंत तर आमी तुझ्या घरी अन्न घेणार नाही. गावबा-आपल्या ह्मणण्याप्रमाणे पितर आणले तर मग ? धर्माधिकारी-मग त्यांच्या पायां पडूं. आणखी याला परमेश्वर समजूं. एकनाथ-इतर गांवांतले हजार ब्राह्मणांस भोजनास घातले तर क्षेत्रांबला एक जेवल्याप्रमाणे आहे. क्षेत्रवासी हजार जेवले तर एक वेदपाठक जेवल्याप्रमाणे आहे. एक हजार वेदपाठक जेवले तर एक पंडित जेवल्याप्रमाणे आहे. एक हजार पंडित जेवले तर एका संन्याशाबरोबर. एक हजार संन्यासी एका परमहंसाबरोबर. हजार परमहंस एका ब्रह्मवेत्त्याबरोबर. ब्रह्मवेत्ता भोजन घालून तृप्त केला तर