पान:श्रीएकनाथ.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १३३ ब्राम्हण--(गिरजाबाईस सोडून देतो.) काय करावे, हा रागार्ने लाल होत नाही. माझ्या चार श्रीमुखांत भडकावीत नाही. सगळा माझा प्रयत्न फुकट. आतां माझ्या बाळ्याचे लग्न होत नाही. माझ्या वंशाचें नकल झाले. नारायणा, आता काय करूं? आतां मला पांचशे रुपये कोण देईल ? (रडू लागतो.). एकनाथ महाराज आपण रडूं नका. आपल्या सेवेकरितां पाहिजे असल्यास आमचे कुटुंब घेऊन जा. ब्राम्हण—छे छे ! महाराज ती माझी मातोश्री आहे, अशी पापबुद्धि माझ्या मनांत उत्पन्न झाली असती तर तिच्या अंगाला हात लावतांच मी जळून खाक झालो असतो. एकनाथ--आपल्यावर असे कोणचे संकट आले आहे ! या दासाच्या हातून त्याचे काही निवारण झाल्यास पहा. गावबा-आपण सुद्धा एखादी बायको अशीच धरून आणावी ह्मणजे झाले. पण मार खावा लागेल." बाम्हण-महाराज, येथल्या धर्माधिकाऱ्यांनी अशी पैज मारली होती की, एकनाथास जर क्रोध आणलास तर पांचशे रुपये देऊ. पांचशे रुपये मिळाले ह्मणजे माझ्या बाळ्याचे लग्न होईल, असे मनांत आणन, मी आपल्यास क्रोध आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण शांतीचे पाणिग्रहण केल्याने, काम क्रोध बंदीखान्यांत टाकल्याने माझी फार फजिती उडाली. आतां मी काय करावें ? मी आपल्यास शरण आहे. एकनाथ-भिऊं नका. मी आपल्यास पांचशे रुपये देतो. आपल्या चिरंजीवाचे लग्न करून देतो. तुम्ही सरळ रस्त्याने आला असतां तर चांगले झाले असते. असो, वाकड्या रस्त्याने आलांत हेही एक प्रकारे बरे झाले. क्रोधाच्या आधीन होतो की काय, याची एक कसोटीच झाली. अरे श्रीखंड्या, उमीचंदाला म्हणावें, या बाम्हणाला पांचशे रुपये द्यावयाला सांगितले आहे. यावें महाराज आपण. (ब्राम्हण जातो. धर्माधिकारी व ब्राम्हण मंडळी पळीपंचपाव्य, दर्भ वगैरे घेऊन प्रवेश करतात. महारांची पंगत बसलेली पाहून थबकून लभे राहतात. अत्यंत रागावतात. महार पळून जातात.)