पान:श्रीएकनाथ.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. राण्या -- कामाजी कोतवालाने नागविलें बहुतासी॥ हरिहराची अबरू घेतां भय नाहीं त्यासी ॥ जोहार मायबाप, जोहार, महार मी कायापुरीचा ॥ जन्मोजन्मी बेसराखा आहे या नगरीचा जोहार मायबाप ॥१॥ जानकाई--जुनाट जोगडा काळाचा काकडा डोंगरी राहतो उघडारे ॥ झडपिला हांवे नागवाची धांवे पाठीसी लागला भील भोंडारे ॥ काजळखोपा नेटक रूपा पाहुनि भुलला तोंडारे ॥ महाभ्यासुर जटाधारी वीर्याचा चालला लोंढारे ॥ धोंगड माझे बोलणे कान्होबा, धोंगड माझे बोलणे रे ॥१॥ एकनाथ-काही हरकत नाही. ब्राह्मणाला संभाळून तूप वाढ. त्यांना पडू देऊ नको. त्यांना अगदी दुखवू नकोस. हे बघ, अपकान्यावर जो उपकार करतो त्याला शांतीची मूर्ति ह्मणतात. त्यालाच परमार्थ लाभेल. विश्वामित्राने हरिश्चंद्राचा नानाप्रकारे छळ केला; परंतु त्याच्या मनाची शांति ढळली नाही. कबीराने खतःची बायका संतांना भोजन घालून तृप्त करण्याकरितां आपल्या खांद्यावर घेऊन वाण्याची कामवासना तृप्त करण्याकरितां त्याच्या घरी नेऊन घातली. पांडरंगा, या वेळी माझ्या मनाची शांति ढळू देऊ नका. महाराज, आपल्यास काय पाहिजे ! भिडावू नका. आपल्यात कोण पाहिजे ? ब्राह्मण--तुझी बायको.. एकनाथ-- अभंग. मशीनरी आपुलीच दारा जरी टेके व्यभिचारा ॥ क्रोधाचा थारा अंतरीं नये ॥२॥ आपुलेच धन तस्करें नेतां जाण ॥ जयाचे मन उद्विग्न नव्हे ॥२॥ आपुलाची पुत्र वधोनी जाय शत्रु॥ परी मोहाचा पाझरु नेत्रीं नये ॥३॥ आपुलें शरीर गाजिता परनरें ॥ परी शांतीचे घर चळों नेदी॥४॥ एक जनादना जया पूर्ण बोधु ॥ तोची येक साधु जगामाजी ॥५॥