पान:श्रीएकनाथ.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १३१ मारावयास धांवावयाचें. प्रसंगोपात त्याला ठार मुद्धां मारावयाचें. परंतु हा स्वभाव एकनाथाच्या अंगी असला मात्र पाहिजे. त्याने मला क्रोधाने मारले पाहिजे. नाहीतर मला कांहीं रुपये मिळत नाहींत. बाळ्याचें लग्न कांहीं होत नाही. देवाचें नांव घेऊन खटपट करावी. देव तरी अशा वाईट कृत्यांत आपल्याला सहाय्य कसा होणार ? ( विचार केलासें करून.) आतां येथे पंक्तीत छपून बसावें. एकनाथाची बायको वाढायला आल्याबरोबर तिला धरतों-पुढे सुचेल तसे करतो. एकनाथाने मारले जोड्याखाली तर धर्माधिकाऱ्याकडून हजार पांचशे रुपये खास मिळतील. (जातो. पंक्तीत लपून बसतो. महार पाटांवर बसून भोजन करीत आहेत असा पडदा उघडतो.) नाम्या-यासनी काय म्हनत्याती बर जानकाई वहीनी ? जानकाई-याला म्हनत्यात बुंदीचा लाडू. नाम्या-मंग या गोच्या गोळ्या एकाला एक कशान चिकटल्याती, खळीन व्हय, का डिकाने ? . तुक्या-अन खुसखुस कुडुंब कुडुंब काय करतया बर जान- काई वहीनी ? तुह्मी लयी सुग्रन हायीती. याच नाव काय हाय बर ! जानकाई-थाच नाव कुरडया. तुक्या--मंग का गव्हाच सुत काढून त्याच्या केल्या हाईती व्हय! राण्या-गुमान म्होर पाहून जेवा झटपट नाहीतर जर का ते नदीवरून बामन आल तर खेटराखाली मारत्याल. गिरजाबाई--काय लागेल तें मागून घ्या बरें का! संकोच मानू नका. ( ब्राह्मण पाठीवर हात ठेवतो. ) ब्राह्मण--(एकीकडे.) कोण घोर कर्म हे ! सान्या माझ्या जन्मांत मी असें काम केले नाही. माझ्या बायकोला जर दुसऱ्याार्ने अशी धरली असती, तर मी नरडीचा घोट घेतला असता. गिरजाबाई-अग बाई, हा कोण सातारा ? याने एकदम येऊन मला धरले. याला ह्मणावे तरी काय ? सोडा मला. हे काय चाई बेलाशक लोकांच्या बायकाच्या अंगाला झॉवणे ह्मणजे ! याला काय ह्मणावें ? मातारपणांत अक्कल जाते ह्मणतात हे काही सोर्ट नाही. साठी बुद्धि नाटी. ह