पान:श्रीएकनाथ.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीएकनाथ. श्राद्ध करावें. सव्यापसव्याचा घोटाळा संभाळा बरे का गेननाईक महार. जेवतांना एकमेकांला शिवू नका. नाही तर तुक्या टाकतो सोपान्याच्या पानांत भाकरी तसे येथे चालणार नाही. आजपासून तुमी लोक ब्राह्मण झालांत याचा विचार करा. आतां लौकरच तुमच्या मुलीसुद्धा आह्मीं करूं. आझाला मात्र वेडेवेडे ह्मणायचे. मग आतां याला काय ह्मणावयाचें ? (श्रीखंड्या प्रवेश करितो.) श्रीखंड्या-महाराज, सर्व तयारी आहे. ब्राह्मण स्नानसंध्या करून नदीवरून आले नाहीत तोच हा कार्यभाग उरकून घ्यावा. चलारे, एकएका पाटावर एक एक जण बसा मुकाट्यानें. गावबा-एका पाटावर बसा आणि एका पाटावर पाय ठेवा, बरें का. एकनाथ–राण्या, चला लवकर. तुझी मनांत कांही संकाच धरूं नका. स्वस्थ अंतःकरणाने तुम्हाला जे लागेल ते मागून घ्या, आणखी पोटभर जेवा. तुमचे स्वतःचें हें घरच आहे समजा. (सर्व पडद्यांत जातात. एक वृद्ध ब्राह्मण प्रवेश करतो.) ब्राह्मण-बाळ्याला आतां विसावें वर्ष लागले. एवढाच मुलगा, पण त्याचे लग्न होण्यास मार्ग नाही. काय करूं या दारद्राला । कमीतकमी पांचशे रुपये तरी पाहिजेत. म्हटले, येथील ब्राह्मण मंडळी सभा करून कांहीं वर्गणी करून एवढे ब्राम्हणाचे कार्य पार पाडतील; पण काही नाही. धर्माधिकान्याकडे गेलो. त्याने अशी पेज मारली आहे की, एकनाथाला जर तूं क्रोध उत्पन्न केलास तर पांचशे तर काय परंतु हजार रुपये तुला देऊ. मी तर पैज मारून चुकलों. आतां पडली पंचाईत. एकनाथाला क्रोध उत्पन्न होऊन त्यांनी मला मारिलें पाहिजे. ही गोष्ट घडून येणार कशी? देवा, एकनाथाने माझ्या चांगल्या दहापांच श्रीमुखांत मारूंदे, म्हणज मला रुपये मिळतील. तो म्हणतात केवळ शांतीचा आगर आह. शांती हेंच ब्रह्म. मी दुष्टबुद्धि त्याला छळावयास आलो आहे. आता त्याच्या घरांत डोकावून आलों तो त्याने महारांची पंगत भोजनास वसविली आहे, त्याची बायको वाढते आहे. मनण्यमात्राचा स्वभाव असा आहे की, स्वस्त्रीकडे कोणी पापदृष्टीने पाहिले की पुरे, त्याला