पान:श्रीएकनाथ.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२९ त्यांना गार पाणी वाढ आणखी पंख्याने वारा घाल. (गावचा जातो.) श्रीखंड्या, तूं काय करतोस ? : श्रीखंड्या-मी होय ? पाटरांगोळ्या करतों, आईसाहेबाला चाहूं लागतों, आणखी उष्ट्या पत्रावळी काढून गंगेत नेऊन टाकून ब्राह्मण येण्याचे अगोदर शेण घेऊन भुया वगैरे सारवून लक करून स्नान करून पुनः स्वयंपाक तयार करून ठेवतो. आपण काही भिऊं नका. परमेश्वर आपली संकटांतून मुक्तता करील. महारांला भोजन घातल्याबद्दल धर्माधिकाऱ्याला अत्यंत क्रोध येऊन ते श्राद्धाला येणार नाहीत. परमेश्वराने त्यांचे पितर स्वर्गातून पाठवावे, झणजे याचा नक्षा उतरलाच. (जातो.) एकनाथ-अरे राण्या, आमचा बेत काय झाला तुह्मांला कळला कारे ! राण्या-महाराज, आमी समद ऐकत हतच उभ हाईती. पन महाराज आमच्यापायी आपल्यासनी लयी तरास पडतो. हे बामन आपल्यासनी मारत्याल, काय करत्याल, काईबी सांगवत नाही. झननशान मनतो आह्मासनी त्येंच भोजन झाल्यावर वाईच उष्ट्यामंधी खरकट द्या ह्मणजे झाल. गेन्या--काय मनत्यात नई, खरचनाराच खरचत पन कोठावळ्याच पोट दुखत. तुला लेका चोंबडेपना कुनी कराया सांगितलाय ? मालक आपल्यासनी राजागत खायाला घालतोया आन तू उष्ट्यामधल तुकड कशापायी सातोसया ! लेकाला नरुट्यात जेवायाची सवच बघा. चांगल पचपकानाची ताट देत्याती. आपल्या बान चि पाहिली नसत्याल. गिरजाबाई--अरे महारांनों, आणखी तुमची काही मंडळी असली तर घेऊन या, झणजे मग अर्से न व्हार्वे की, या केलेल्या स्वयंपाकांत तुमी जेवावे आणखी आह्मीं ब्राह्मणांकरितां दुसरा केला की, पुनः दुसऱ्या महारांनी यावें. (एकनाथास उद्देशून ) बरें. मी वाढण्याची तयारी करते. ( जाते. गावबा प्रवेश करतो.) गावबा--पाटरांगोळ्या घालून तयारी केली आहे. आतां महार, मांग व चांभार वगैरे ब्राह्मणांनी देवस्थानी पितृस्थानी बसून यथासांग