पान:श्रीएकनाथ.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ श्रीएकनाथ. आली होती. पण करायचे कसे? आपण उभयतां ब्राम्हणाचे सासुर वासी आहों. शापादपि शरादपि. दुर्वासऋषि येण्याचे अगोदर अंबरीष राजाने नुस्ते देवाचें तीर्थप्राशन केले, तर त्यांनी त्याला शाप विनाकारण दिला. कपिलमुनीला क्रोध येऊन त्यांनी सगराला शाप विनाकारण दिला. नलकुबेराला शाप देऊन नारदाने त्यांचे वृक्ष बनविले. हा कोध मोठा दुष्ट आहे. प्रत्यक्ष श्रीगजानन-सर्व विघ्नांचा हरण करणारा-त्याला क्रोध यावा काय ? पण त्याला क्रोध आल्याबरोबर चंद्राला शाप दिला. आपण उंदरावरून पडल्याचे बाजूलाच राहिले. प्रत्यक्ष ईश्वरानेसुद्धां क्रोधाला वश होऊन दक्षाबरोबर यज्ञ चालविणाऱ्या ऋत्विजांचासुद्धा शिरच्छेद केला. ह्मणून ह्मणत परिणामाकडे लक्ष आहे का ? एकनाथ-मग या महारांना विन्मुख लावू ? छे, हे माझ्या हातून होणार नाही. ज्या परमेश्वराने दुर्वास ऋषीच्या मागें सुदर्शन लावून अंबरीष राजाला विनाकारण शाप दिला ह्मणून शिक्षा केली, तोच कृष्णपरमात्मा या ब्राह्मणांच्या हातून माझें रक्षण कराल. भूतदयेची आलेली ही संधि मी फुकट घालविणार नाही. ( आखड्या व गावबा प्रवेश करितात.) श्रीखंड्या, माझ्या मनांत ब्राह्मणांसाठा तयार केलेला सर्व श्राद्धाचा स्वयंपाक या महारांच्या पदरांत घालावा, असे आहे. तुला कसे वाटते ? श्रीखंड्या--फार चांगले महाराज. त्यांना येथे आपल्या आंगणांतच भोजनास घालावे. गरीब, अंध, पंगु, अनाथ, दुबळे, अशांला अन्नाचा धर्म केला असतां परमेश्वर संतुष्ट होतो अस ह्मणतात. या बिचान्या महारांना जिलबीचे जेवण कशाने मिळणार! जातों मी. पाटरांगोळ्यांची तयारी करतो. या गाववा-मग त्यांना नेसायला पीतांबर आणखीन पांघरायला शालजोड्या काढू का ? ह्मणजे नदीवरून धर्माधिकारी आले की, त्यांना वाटेल हे कोठले ब्राह्मण ! कानडी का द्रवीडी, तेलंगी का हिंदुस्थानी, का हे महार ब्राह्मण ? गिरजावहिनी, तुझी लौकर चटण्याकोशिंबरी वाढावयाला घ्या. एकनाथ-ऐक रे, शालजोड्या पीतांबरांची गरज नाहीं ! तू