पान:श्रीएकनाथ.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. राण्या-चला राव उगच, काय लोकाच्या दारामंदी गरदी. चला आपुन आपल्या कामासनी निघून जाऊ. गेन्या--आपल्या बाच्यानवि यक पाऊल बि आता म्होर टाकन व्हनार न्हाई. आर नाहीं जिलबि खायाला तर नाही, पन तिचा वास तर येतोया. तेवढिच सई. आपुन निस्त वासावरच खुस मानुनशान घेऊ. नाही आपल्या कपाळी आसल आन. देवा, आम्ही जातिच म्हार, पन आह्मी का मानस न्हाई बर? सान्या जलमामंधी आह्मासनी येक दिसबि असल पोटभर गोड अन्न मिळत नाही. आमची तुला काई कारुना नसाविना बर ? तुक्या-- बैलाच्या पाठीवर साखरच्या गोन्या, आन तुपाच बुदल, आन चालल राजाच्या घरी लग्नाला. पन त्येला खायाला काय ? फार फार झाल तर पेंड नाही तर कडब्याची ताट. त्यांतली आपली गत. धरा म्हारासनी बिगारीला, द्या त्याच्या डोसक्यावर मोठाली वझी आन पोटाला पैस मागितल तर ढुंगणावर दोन लाथा. सोपान्या--आर एकनाथमहाराज समुरच हाय. त्येंच्या शेजारी आपुन राहातो, पन आसल आन पोट भरुनशान कंधी तरी मिळाल हाय का ? नाम्या-- गाढवाच धनी त्याच्या ढुंगणावर एक टिकुर मारतो, आन देतो उकरडा फुकाया पाठून. तस आतां घरचा मालक 07 आला की, खसकन आंगावर कुत्र्यावानी धाऊन येईल. नाही तर एकांदा आगांतुक बामन जरी आला, तरी तसच करील. म्हनजे आपुन आगांतुक, पन आम्हा गरीबाला उगच डसाया धावायच. गुमान आपल्या घरी चला नाही तर दारात गर्दी केली मननशान मार मातर मिळल.( एकनाथ व गिरजाबाई प्रवेश करितात.) एकनाथ--यांचे भाषण ऐकलें म्हणजे पोटांत तडतड तोडा-reli याला लागते. आतां ऐन दोन प्रहर झाले. तुमच्या बाम्हणाला तर अजून पत्ता नाही. मी म्हणतों, या महारांचे मन त्या श्राद्धाच्या अन्नावर गेलेले आहे. यांना जर आपण हे अन्न दिले तर काय होईल ? बाम्हणांला राग येईल काय ? गिरजाबाई--हे काय बोलणे? माझ्या मनांत आता हीच कल्पना