पान:श्रीएकनाथ.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ श्रीएकनाथ. जानकाई--अर बावांनो, आपल्या कपाळी असल कुठल अन्न. अपुन आपली चटनी भाकर खावी, आन पाटलाच्या म्होर म्होर कराव आन कोतवालाच्या म्होर न्होर करावें नाईतर बका बका लाथा खाव्याती. आपली चटनीन भाकर. राण्या -मंग ती का वाईट हय व्हय ? अर कसलबी अन खाल, तरी तोंडांत घास हय तवर त्ये ग्वाड. आन मंग मी म्हनतो, नरड्याच्या खाली चावूनशान गेल्यावर त्येची काय चव हाय काय ? च मंग लाडू असो नाई तर जिलबी असून द्या, नाही तर आठा दिसाची शिळी भाकर असून द्या, समद सारखच. हा जिभचा शेंडा लयी शिंदळ हय, यवढा ताब्यात ठीवा मनजे कंधी बी राग येनार नाही. आन कसली बी आस्ता व्हनार नाई. जिलबी आन कांदाभाकर सारखच. मडक्यानी पानी पेल काय आन रुप्याच्या पचपात्रानी पेल काय सारखच. तान गेली हनजे झाल. गेन्या–कस गिन्यान बोलतोया ? जातीचा महार पन आक्षी गिन्यान बोलतोया. पन गड्या रान्या, तुझ गिन्यान हामासनी नग. आमच्या समद्याच्या पोटामंधी कालपून अन नाई; आन हा घमघमाट आल्यान आमच्या पोटामंधी कस भुकन भकभक होतया. नाम्या--पोटामंधी आग लागलीया आग, अहाहा, काय वास येतोया ! नाही तर आमच्या घरी-कांद्याची घान. तुक्या-माझ्या तोंडाला अक्षी मघापुन आळा घालतोया. पन ही जीभ रांड लयी वंगाळ हय. आपल्या गरीबासनी कोन असला उन्हून गरम गरम ताजा माल खायला घालतया ? बर पैस खरच करून सामान केसर आन कस्तुरी आनली, आन साखर तूंप आनल, तर इचभन आमच्या अस्तुरीला करताबी येत नाही. जानकाई--अस्तुरीला मनाव कस्तुरी घाल जिलबीमंधी. काय मेला बोलतोया, अस्तुरीला करता येत नाई. यमाई मारीन तुझी बायको तर लयी मुग्रन हय मनुनशान समद्या म्हारवाड्यामंधी बोलत्याति. ते अमूंदे. आन समद सामान, मी तुला जिलबी करूनशान घालते. सोपान्या--जिलबी करतांना म्हनत्यानी मडक्याला भोक पाडूनशान त्येचा मंधून पीठ गाळाव लागत.