पान:श्रीएकनाथ.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२१ वळ श्री जनार्दनरुपेकरून घडून आल्या. ( मठाधिपति पुस्तक मस्तकावर धारण करून जातो. त्याच्यामागून नारायणनामाचा गजर करीत सर्व जातात.) प्रवेश दुसरा. स्थळ-एकनाथाच्या घरापुढचे पटांगण. । (राण्या महार व त्याची बायको जानकाई प्रवेश करितात.) जानकाई--अहाहा! काय पन घमघमाट सुटला आहे. कशाचा बर वास येतुया? राण्या--मी सांगू व्हय? बामन खात्याती ते गुळमट गुळमट आपल्याला खरकट्यामंधी लहान लहान तुकड घावत्याती. त्येचा घमघमाट येतुया. जानकाई--पन त्येच नाव काय ? राण्या--कुनाच्या बाला नाव न गाव ठाव्. आपल चटनी भाकरीच नाव आपल्याला म्हाईत. ते वाटोळ्या कड्यागत असत. जानकाई--जिलबी म्हनत्यात त्याला जिलबी. तिला तळाव लागत. ती तळत्याती म्हणूनशान कसा घमघमाट चालला हाय. ( नाम्या, सोपान्या, गेन्या, तुक्या, वगैरे पुष्कळ महार व कांहीं महारणी प्रवेश करितात.) गेन्या-का रानबा, तुम्ही तर नाथमहाराजाच लयी लाडक. तुमच्याघरी येऊनशान त्येनी आमटी भाकरी खाल्ली. पन तुम्हाला त्येनी आपल्या घरी कुठ कधी बोलावलया ? तुम्हाला पंक्तीला घेऊनशान ते आपल्या घरी कंधी जेवलत का ? ते होनच नाही बर का. नाम्या--आन गेला असला चोरुन मारुनशान तर कुना लेकाला ठाव ! तुम्हा आम्हाला का पुसुनशान जाईल व्हय ? सोपान्या-हंग आपल्यासनी जर संग घेऊनशान गेला आन खायाला घातल तर काय नामी गोष्ट होईल बर. तुक्या-लेकांच्या तोंडाला जन पानी सुटलय अगदी. माझ्या बि सुटलय पन अपुन अस बोलूनशान दावनार नाही.