पान:श्रीएकनाथ.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ श्रीएकनाथ. धिकाऱ्यांना येथील धर्माधिकारी मिळून गेले. उभयतांची आज्ञा तुझें भागवत गंगेत झुगारून द्यावे अशी आहे. एकनाथ--भूदेवांची आज्ञा जशी असेल, तशी मला मान्य केली पाहिजे. ज्या जनार्दनाने भागवतावर भाष्य करण्याची मला बुद्धि दिली, त्यानेच त्यांना ते गंगेत फेकून देण्याची बुद्धि दिली आहे. दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत. परमेश्वर भक्ताची महती वाढण्याकरितां कधी कधी त्याच्यावर विलक्षण संकटे आणतो. त्याचेच ह एक उदाहरण आहे. यतिमहाराज, हे पुस्तक मी केलेले नसून 1. माझे पूज्य गुरुवर्य स्वामी जनार्दन यांचे आहे. हे आपण घ्या. (पोथी मठाधिपतीचे स्वाधिन करितो. तो नदीत फेकून देतो. गंगानदी पा*ण्यांतून हात बाहेर काढून वरचेवर पोथी झेलते. हातांचा दिव्य प्रकाश पडतो, धर्माधिकारी पळून जातो.) मठाधिपति--काय हा अद्भुत चमत्कार ! विष्णुकन्या जी गंगानदी तिनें ग्रंथ वरचेवर झेलला ! केवढी ग्रंथाची महती आहे ! या काशीक्षेत्रांतील ब्रह्मवृंदांनी मला शूळावर दिले तरी हरकत नाही, परंतु हा अत्यंत पूज्य ग्रंथ मी आपल्या मस्तकी धारण करणार. (पाण्यांतून पोथी काढून वर आणून मस्तकी धारण करितो. सर्व मंडळी नारायणनामाचा घोष करितात.) हे माझ्या शिष्यवर्गानों, तुह्मी या ग्रंथाचे नित्य पूजन करीत जा. याचे श्रवण, मनन, पठण करीत जा. आपण याची हत्तीवरून मिरवणूक काढणार. श्री एकनाथ याची आपण-महापुरुष-परमात्मा-समजून महापूजा करूं. एकनाथ महाराज, आतां तुझी या काशीक्षेत्रांत राहून या ग्रंथाची परिसमाप्ति करावी. नित्यशः आह्मांस या ग्रंथाचे दर्शन होईल. समाप्ति झाल्यावर आपणास पैठणास जाण्याचा रुकार देऊ. एकनाथ-जशी महाराजांची आज्ञा असेल तसे करतो. पूजेविषयी म्हणाल तर माझी पूजा आपण करूं नये. मी पालखीत अथवा हत्तीवर बसण्यास अयोग्य आहे. आपल्यास वाटल्यास ग्रंथाची महती वाटेल तितकी वाढवावी. माझी हरकत नाही (एकीकडे) श्रीदत्तात्रेयाचे दर्शन आणि भागीरथीने भागवत ग्रंथाला आपल्या इस्ताच्या ठायीं धारण करून दिलेले प्रोत्साहन, या दोन्ही गोष्टी के