पान:श्रीएकनाथ.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. १२३ धर्माधिकारी--अहो यतिमहाराज, भागवतावर प्रारुत टीका म्हणजे अत्यंत घातक गोष्ट आहे. हे पाखंड मत हा दिवसेंदिवस वाढवीत चालला आहे.तुम्हांला अगदी भ्रांत पडली. हे पाखंडमत अल्पत्वल्प आहे तोच याचा नायनाट करून टाका. या महाक्षेत्रांत जी गोष्ट मान्य झाली, तीच चोहोंकडे मान्य होणार नाही. यांत तुमच्या क्षेत्राच्या नांवास काळिमा लागणार आहे. वैदिक, शास्त्री, पंडित, या सर्वांचे आपल्यास हात जोडून हे मागणे आहे की, तुझी सर्वज्ञ आहांत, सर्व विद्येचें मूळपीठ आहांत, चतुर्थाश्रम धारण केलेले आहांत, पैठणच्या एका भटुरड्याने भागवत ग्रंथावर टीका करावी, आणखी ती तुझी मान्य करावी, हे लांछनास्पद आहे. ज्याप्रमाणे व्यासाने जैमिनीचें भारत बुडवून टाकिलें अथवा शंकराचार्याने जैन मताचे ग्रंथ बुडवून टाकिले, तसें हें एकनाथी भागवतरूपी भारूड तुह्मी गंगेत झुगारून द्या. आह्मां ब्राह्मणांना आनंद उत्पन्न करा. यांत तुमच्या नांवाचा आणखी तुमच्या क्षेत्राचा लौकिक वाढणार आहे. तुम्ही फक्त ग्रंथ माझ्याजवळ आणून द्या, म्हणजे मी फेंकून दिलाच असे समजा. मठाधिपति-(एकीकडे ) या दुराग्रही ब्राम्हणापुढे माझा कांहीं उपाय चालत नाही. माझ्या मनांत तर असें होते की, आम्ही सर्वत्रांनी नाथमहाराजांचे आणि त्यांनी केलेल्या ग्रंथाचे पूजन करावें. तो ग्रंथ व त्याचा कर्ता यांना पालखीत बसवून पालखी हत्तीवर ठेवून मोठ्या समारंभानें सात दिवस सर्व काशीक्षेत्रांतून मिरवणूक काढावी. परंतु या ब्राम्हणापुढें कांहीं इलाज चालत नाही. विचायाला ग्रंथाची रचना करण्याला किती श्रम पडले असतील ! धर्माधिकारी-काय विचार चालला आहे ? अहो पहातां काय ? त्याच्या हातची पोथी घ्या हिसकावून, आणखी एक वेळ माझ्या हवाली करा की, मी तिला जलसमाधि दिलीच समजा. मग काय होणार असेल ते होवो. मठाधिपति-एकनाथ, तुझा ग्रंथ मला सर्वस्वी मान्य आहे. परंतु या हट्टी ब्राम्हणापुढे माझा काही इलाज नाही. पैठणकर धर्मा