पान:श्रीएकनाथ.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ श्रीएकनाथ. भगवन्. ( साष्टांग प्रणिपात करतो. एकनाथ त्यास उठवितो. सर्व संन्यासी नारायणनामाचा गजर करितात.) , श्रीखंड्या-अकबर बादशहा आपल्या अविध पंडितास या काशी क्षेत्रांतील विद्वान म्हणविणा-या ब्राम्हणांकडून संस्कृत भाषा शिकवून रामायण आणि भारत यांचे तरजुमे फारशी भाषेत बेलाशक करीत आहे, त्याला कां हे धर्माधिकारी आणि मठाधिपति शिक्षिा करीत नाहीत कोण जाणे? गाववा-कदाचित् तो यांची मुंताच करील म्हणून. श्रीखंड्या-(एकीकडे ) राखेखाली धुमसत राहिलेला अग्नि जता घृतसिंचन केल्याने अधिकच प्रज्वलित होतो, तसा या वाग्युद्धांत मठाधिपति पराजित झाल्याने धर्माधिकारी बुवा अधिकच खवळून गेले आहेत. बिळांतला नागोबा जसा फुत्कार करून अंगावर चवताळून येतो, तसे याला वाटत आहे की, या संन्याशाला आणखी त्याच्याबरोबर या एकनाथाला एकदम शूळावर चढवावें. आतां हा ब्राम्हण या संन्याशावर तुटून पडणार बरें का गावबा ? गाववा--तो जर मजवर तुटून पडेल तर फार उत्तम होईल, तो एक भाकरी खात असेल तर मी दोन खाईन. तो दोन, तर हा पठ्या चार, तो चार, हा आठ. पाहिजे असेल तर याच बैठकीला होऊन जाऊ द्या. ( धर्माधिकारी गावबास मारतो. मठाधिपतीला धर्माधिकारी बाजूला ओढतो व एकीकडे नेऊन बोलतो.) धर्माधिकारी--तुम्हाला त्या मूर्खाने इतकी काय भुरळ पाडली मला समजत नाही ! तुम्ही जो त्याला परमेश्वर बनविला आहे, इतकें आधिक त्याच्यांत तुम्हांला काय दिसून आले ? मठाधिपति--मला त्याच्या ठिकाणी शांति, दया, तितिक्षा, निरिच्छता, इंद्रियदमन, इत्यादि गोष्टी इतक्या बाणलेल्या दिसतात की, त्याच्या शतांशहि माझ्या ठायीं मी संन्यासी असून नाहीत. संस्कृत ग्रंथावर टीका कां करूं नये, याचे सप्रमाण खंडण माझ्या हातून होत नाही. माझ्या सहा शास्त्रांपैकी एकाहि शास्त्राचा उपयोग या वेळी होत नसून त्याने आपल्या कोटीबाज भाषणाने मला बोलण्यांत कुंठित केले.