पान:श्रीएकनाथ.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. देवता । हे ही त्रिविधता मायेची॥७॥देह देही देहाभिमाना भव भय भवबंधन । मुक्त मुमुक्षु अज्ञान । है ही विंदान मायेचें ॥८॥ सुख दुःख जडत्व पूर्ण । अधि समाधि व्युत्थान । उत्पति स्थिति निधान । इहीं लक्षणीं संपूर्ण माया विलसे ॥९॥नभी नीळिमा पूर्ण भासे। शेखी नीळिमेचा लेश ही नसे! तेवीं स्वरूपी माया आभासे । मिथ्या वेशे मायिक ॥१०॥ ( आत्मगत ) यांत तर बोट शिरकविण्यास जागा नाही. याने मूळचा अर्थ तिळमात्र न सोडितां पूर्णपणे व्यक्त करून दाखविला आहे. भाषेचे सौरस्य इतकें मजेदार आहे की, ते पाहून मी तर दिपून गेलो. आतां मी अगदी गोंधळून गेली आहे. एकनाथ--अहो श्रेष्ठहो, मी तुमच्या चरणांपाशी अशी विनंति करितों की, मला आपल्या चरणाचें एकवार दर्शन द्यावे. आपल्या दर्शनाचा हेतू मनांत धरून येथपावेतों आलो. आतां पडदा दूर करून मला दर्शन द्या. माझ्याकडून कांहों अपराध घडला असेल तर त्याची क्षमा करा. मी मतिमंद आहे, मूढ आहे, मला संस्कताचे गम्य नाही, भावहीन-भक्तिहीन-ज्ञानहीन-वैराग्यहीन-शास्त्रपठण नाहीं-वेदाध्ययन नाही, असा सर्व प्रकारे केवळ भूमीला भारभूत झालेला आहे. तुझी साक्षात् नारायणमूर्ति आहां. महालेत्रांत वास्तव्य करीत आहां. तुमी जर माझे अपराध पोटात घातले नाहीत, तर सर्व जग माझी हेळसांड करील. तात्पर्य, माझ्या वरचा राग दूर करून मला दर्शन देऊन माझा उद्धार करावा. मठाधिपति-अहाहा ! काय याची वाणी अमृतासारखी गोड आहे. चित्ताच्या ठिकाणी शांति किती बाणलेली आहे ! अविद्यारूपी अंधःकाराने माझें हृदय दाटून गेले होते. त्यांत याच्या भाषणाने ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडून माझा क्रोध निघून गेला. हा प्रत्यक्ष परबम्हमार्ति आहे. सच्चिदानंदघन आहे. निर्विकार आहे. जगाचा उद्धार करण्याकरितां परमेश्वराचा हा अवतार असून त्याने रुपाळू होऊन मला दर्शन दिले. (पडदा बाजला करितात.) जे ध्यान भागवतांत श्रीरुष्णमूर्तीचे वर्णन केलेले आहे, त्याप्रमाणेच मला हा दिसत आहे. त्राहि माम, त्राहि माम