पान:श्रीएकनाथ.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० श्रीएकनाथ, कबीर कमाल, चोखामेळा-जरी ते मुंडण केलेले नव्हते, अथवा त्यांनी जरी भगवी वस्त्रे परिधान केलेली नव्हती तरी त्यांना मिळालीच पाहिजे. शंकराचार्य जातीचा ब्राह्मग-नामदेव जातीचा शिंपीचोखामेळा महार-असला भेदाभेद देवाच्या घरी निःसंशय नाही. यालाच मी अद्वैत सिद्धांत समजतो. गाववा-आमच्यासारखे जसें ब्रह्म न जाणतां केवळ जातीचे ब्राह्मण, तसेच हे कांहीं एक न जाणतां, क्रोधाचा त्याग न करितां जातीचे संन्यासी. तुमची आमची गडी बरें का संन्यासी बुवा. श्रीखंड्या, तूं होतोस का आमचा गडी ? पण तं नको, तुला कधी रागच येत नाही. मठाधिपती-- (एकीकडे ) याच्यापुढे माझी बोलण्याची मति चालत नाही. बोलण्यासारखें सहा शास्त्रांचे अध्ययनांत कांही सांपडत नाही. आतां काय बरें बोलावें ! ( घाबरल्यासारखे दाखवितो ) ( उघड ) तं काळजी करूं नको. तुला जिंकल्याशिवाय सोडीत नाही. आण तुझा ग्रंथ इकडे. एक श्लोक वाचतों आणखी त्याचे भाष्य कसे काय झाले आहे ते पाहतो. जर टीका चुकली असेल, तर ग्रंथ गगत फेंकून देतो. (ग्रंथ घेतो व वाचतो.) 20 श्लोक. एषा माया भगवतः सर्गस्थित्यंतकारिणी । त्रिवर्णा वाण ताऽस्माभिः किं भूयः श्रोतुमिच्छसि ॥१॥ । टीका ॥ उत्तम मध्यम अधम जन । तिन्ही अवस्था त्रिभुवन । त्रिविध कम तीन गुण । हे जाण विंदान मायेचें ॥२॥ ध्येय ध्याता आणि ध्यान । पूज्य पूजक पूजन । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेही त्रिपुटी पूर्ण मायेची॥३॥ दृश्य द्रष्टा आणि दर्शन। कर्मकर्ता क्रिया चरण । भोज्य भोक्ता भोजन । हे त्रिपुटा जाण मायेची॥४॥शब्द श्रोता आणि श्रवण । ध्रेय घ्राता घाण । रस रसना रसस्वादन । हे त्रिपुटी जाण मायेची ॥ ५॥ कर क्रिया आणि कर्ता । चरण चाल चालता । बाल बोलणे बोलता । हे विविधावस्था मायेची॥६॥ अहं साह जड मूढता। साधक साधन साध्यता । देवी देवो परिवार