पान:श्रीएकनाथ.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. ११९ तांत भाष्य करूं नये ह्मणून ? गीतेसारख्या सर्वमान्य ग्रंथावर श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी प्रारुतांत काय झणून भाष्य केलें ? मठाधिपति--गीर्वाण भाषेचे महत्व, त्यावर प्राकृत भाष्य करून कमी केलेंस, याजबद्दल तुला योग्य दंड करितों. एकनाथ-स्वामीस मी असे विचारतों की, गीवीण भाषा कोणी उत्पन्न केली? मठाधिपति-परमेश्वराने. इतकें या मूढाला समजत नाही. एकनाथ-मी तर मूढच आहे, ह्मणूनच विनंति करितों. गीर्वाण भाषा जर परमेश्वराने उत्पन्न केली, तर महाराष्ट्र भाषा चोराने उत्पन्न केली आहे की काय ? मराठी, कानडी, तेलंगी, द्रवीडी, यवनी, कोकणी, मद्रासी, बंगाली, बिज भाषा, हिंदुस्थानी, सिंधी, तामिली, पाली, गुजराथी, मारवाडी या भाषा परमेश्वरानेच उत्पन्न केल्या आहेत. ईश्वराच्या घरौं सर्व जाति आणि सर्व भाषा यांना सारखाच मान आहे. कोणत्याही भाषेत त्याची स्तुति केली तरी त्याला पावलीच पाहिजे. आपल्या ह्मणण्याप्रमाणे जेवढ्यांना संस्कृत भाषा अवगत असेल तेवढ्यांचाच उद्धार होईल; मग आमच्या या भरतखंडांत आणि या सर्व पृथ्वीत शेंकडों जाति आणि शेंकड़ों भाषा आहेत त्यांचा उद्धार होण्यास मार्गच नाही. त्यांचा उद्धार - होण्याचा आपण मार्ग दाखवा, झणजे प्रारुतांत केलेला ग्रंथ फाइन चिंध्या करतो, अथवा आपणच गंर्गत बुडवून टाकावा. मिठाधिपति-माझें ह्मणणे, तुला अठरापगड जातीची काळजी हवी कशाला ? परमपूज्य शंकराचार्य सर्व वर्णाचे गुरु आहेत ते तिकडे त्यांचा उद्धार करोत, नाही तर काय पाहिजे तें होवो. त्यांचा अद्वैत सिद्धांत काय आहे ? मूर्ख, अज्ञानी ! पर एकनाथ--हर ! हर ! ज्या शंकराचार्यांनी ब्रह्मज्ञानाचा अधिकार अति शुद्रांसही आहे असा महासिद्धांत केला आहे, त्याच शंकराचार्यांच्या शिष्यपरंपरेतील आपल्यास समजणाऱ्या मठाधिपतीसरे तत्व कळू नये ह्मणजे त्यांच्या थोर नावास व त्यांच्या उदात्त सिद्वांतास आपल्या हाताने काळिमाच लाविली ह्मणावयाची. अहो. जी गति परमेश्वराच्या घरी शंकराचार्यास मिळाली तीच नामदेवास,